Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: ‘इराणने मोठी चूक केली, आता किंमत मोजावी लागेल’, पीठ हेगसेथ कडाडले; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद

या आठवड्यात अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची ही तिसरी वेळ आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, इराणने चुकीचा निर्णय घेतला आणि आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 12, 2026 | 01:39 PM
us attacks iran thrice pete hegseth warning strait of hormuz closed gfs galaxy ship explosions

us attacks iran thrice pete hegseth warning strait of hormuz closed gfs galaxy ship explosions

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला
  • पीट हेगसेथ यांचा गंभीर इशारा
  • होर्मुझची सामुद्रधुनी बंद आणि स्फोट

US air strikes on Iran tehran 2026 : पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता अधिकच तीव्र झाला असून, अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) समोरासमोर आले आहेत. अमेरिकेने या एकाच आठवड्यात तब्बल तिसऱ्यांदा इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले आहेत. या ताज्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे नवनियुक्त संरक्षण मंत्री (Defense Secretary) पीट हेगसेथ यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत तंबी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे (CENTCOM) अधिकृत निवेदन शेअर करताना हेगसेथ यांनी लिहिले की, “इराणने एक अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेली ही चूक त्यांच्यासाठी अत्यंत महागडी ठरणार असून, आता त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल.”

अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा लष्करी हल्ला शनिवारी सायंकाळी ७:१५ वाजता (अमेरिकन वेळेनुसार) सुरू करण्यात आला. अमेरिकेचा असा दावा आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जाणाऱ्या एका व्यापारी मालवाहू जहाजावर इराणने बेकायदेशीर कारवाई केली होती. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) सायप्रस देशाचा ध्वज असलेल्या ‘एम/व्ही जीएफएस गॅलेक्सी’ (M/V GFS Galaxy) या मोठ्या कंटेनर जहाजावर अचानक हल्ला केला आणि ते थांबवले. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यासाठीच अमेरिकेने इराणवर हा तिसरा मोठा हल्ला केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Father Emir: कतारला नवी ओळख देणारे शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

इराणचा दावा: जहाजाने नियम तोडले, इशारा देऊनही थांबले नाही

दुसरीकडे, अमेरिकेच्या या हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच इराणच्या आयआरजीसी (IRGC) नौदलाने एका निवेदनाद्वारे या कारवाईचे समर्थन केले होते. इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांनी एका कंटेनर जहाजाला अडवले कारण ते जहाज कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आपल्या निर्धारित सागरी मार्गापासून विचलित होण्याचा प्रयत्न करत होते आणि इराणच्या सागरी हद्दीत घुसले होते. इराणच्या नौदलाने या जहाजाला वारंवार थांबण्याचा इशारा दिला होता, मात्र तरीही जहाजाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच इराणला आपल्या सुरक्षेसाठी ही कारवाई करावी लागली. मात्र, या घटनेमुळे दोन्ही देशांमधील आधीच असलेला तणाव आता टोकाला पोहोचला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती चिथावणी दिल्याबद्दल अमेरिका आणि इराण एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

Iran made a poor choice. Now they pay. https://t.co/8m4fEfgrXv — Pete Hegseth (@PeteHegseth) July 11, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकेच्या सेंटकॉमचे असे म्हणणे आहे की, इराणला यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामंजस्य कराराचे (MoU) आणि सागरी नियमांचे पालन करण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती. असे असूनही, इराणने पुन्हा एकदा निष्पाप नागरी खलाशी आणि व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच ठेवले. म्हणूनच, अमेरिकेच्या लष्कराने स्पष्ट केले आहे की, ते प्रत्युत्तरादाखल केवळ अशा इराणी लष्करी क्षमता आणि तळांना लक्ष्य करत आहेत, ज्यांचा वापर करून इराण आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांवर हल्ले करतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Nuclear: 14-कलमी शांतता कराराच्या चिंधड्या उडवत इराणचे अणु ठिकाणांवर गुप्त मिशन; सॅटेलाइट इमेजेसने सत्य आले समोर

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद; किनारपट्टीच्या शहरांमध्ये भीषण स्फोट

अमेरिकेच्या या विनाशकारी हल्ल्यानंतर लगेचच संतप्त झालेल्या इराणने जगाला हादरवणारी घोषणा केली आहे. इराणने म्हटले आहे कि, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अधिकृत सरकारी वृत्तसंस्था ‘इर्ना’ (IRNA) मार्फत सांगितले की, जोपर्यंत अमेरिका या प्रदेशातील आपला बेकायदेशीर लष्करी हस्तक्षेप पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील आणि कोणत्याही देशाच्या जहाजाला या मार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

इराणने अमेरिकेला आणि तिच्या मित्र राष्ट्रांना असाही कडक इशारा दिला आहे की, जर त्यांच्यावर यापुढे आणखी एखादा हल्ला झाला, तर ते या संपूर्ण आशियाई प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या इतर शत्रू लष्करी तळांना (Military Bases) थेट लक्ष्य करतील. दरम्यान, इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाल्यानंतर इराणच्या बंदर अब्बास (Bandar Abbas) आणि सिरिक (Sirik) या प्रमुख किनारपट्टीच्या शहरांमध्ये एकामागून एक अनेक शक्तिशाली स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत, ज्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या स्फोटांमुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: Us attacks iran thrice pete hegseth warning strait of hormuz closed gfs galaxy ship explosions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.