Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Helicopter Crash : मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ! होर्मुझजवळ अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; थोडक्यात बचावले वैमानिक

US Helicopter Crash Update : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा चिघळला आहे. यापरिस्थितीच अमेरिकन हेलिकॉप्टरच्या अपघाताची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप अमेरिकन सरकारकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 11:27 AM
US Apache Helicopter Crash

US Apache Helicopter Crash

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ
  • होर्मुझजवळ अमेरिकन हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
  • थोडक्यात बचावले वैमानिक
US Helicopter Crash Near Hormuz : पश्मिच आशियातील फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरु झालेला तणाव काही निवळण्याचे नाव घेईना. इस्रायल-इराणमध्ये संघर्ष पुन्हा पेटला असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना अमेरिकेसाठी एक धक्कादयक माहिती समोर आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे Apache हे लढाऊ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त (Helicopter Crash) झाले आहे.

Oman Oil Tanker Fire : ओमान किनाऱ्याजवळ तेल टँकरला भीषण आग; २४ भारतीय नाविकांबाबत मोठी अपडेट

सरकारकडून मौन

द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु अद्याप ट्रम्प सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवनेदन किंवा तपशील समोर आलेला नाही. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडूनही याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही.

अपघाताचे कारण अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेवेळी दोन वैमानिक हेलिकॉप्टरमध्ये होते. या दोन्ही वैमानिकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. परंतु अद्याप विमान कोसळण्याचे कारण स्पष्ट नाही. हा अपघात होता की इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हेलिकॉप्टर कोसळले याची अद्याप पुष्टी झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये लष्करी संघर्ष सुरु आहे. यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Hormuz)मध्ये तणावाचे वातावरण आहे. या भागात अमेरिकेच्या लष्करी हालचाली देखील वाढल्या असून अशा परिस्थिती ही घटना समोर आली आहे.

संघर्ष सुरु झाल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत युद्धात अनेक विमाने गमावली आहे. परंतु Apache विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच घटना आहे. Apache AH-64 हे जगातील सर्वात शक्तीशाली आणि अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर मानले जाते. हेलफायर क्षेपणास्त्र, ड्रोन, आणि समुद्री सुरक्षेसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

सध्या या दुर्घटनेनंतर होर्मुझमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभारला आहे. मध्यपूर्वेतील इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष (Israel Iran War ) वाढतच चालला असून होर्मुझ पुन्हा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांततेच्या आवाहनालाही धुडाकवून लावले आहे.

Adm. Brad Cooper, CENTCOM commander, flew over regional waters in and near the Strait of Hormuz in an AH-64 Apache helicopter, May 3, on the eve of U.S. military support for Project Freedom. He interacted with U.S. Army Soldiers after visiting with Sailors and Marines on Saturday… pic.twitter.com/NEc9YCFBPB — U.S. Central Command (@CENTCOM) May 4, 2026

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश

Web Title: Us helicopter crash near strait of hormuz pilots safely rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • America
  • helicopter crash
  • World news

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
3

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
4

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.