Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : युद्ध थांबणार? इस्लामाबादमध्ये पुन्हा रंगणार अमेरिका-इराण शांतता चर्चा, ट्रम्प ७२ तासांत घेणार मोठा निर्णय

US Iran Peace Talks : अमेरिका इराण तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. परंतु ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धबंदी जाहीर केली असून ७२ तासांत निर्णय होणार असल्याचे म्हटले आहे. पण इराणने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 11:05 AM
US Iran Peace Talks

US Iran Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण पुन्हा शांतता चर्चेच्या टेबलावर येणार
  • इस्लामाबदमध्ये चर्चेसाठी हालचालींना वेग
  • ७२ तासांत घेतला जाणार निर्णय
US Iran Second Peace Talks to Be Held in Islamabad : वॉशिंग्टन/तेहरान/इस्लामाबाद : गेल्या महिन्याभरापासून अमेरिका इराण युद्ध (US Iran War) सुरु आहे. दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबद येथे झालेली पहिली शांतात बैठक निष्फळ ठरली आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ७२ तासांच्या आत दुसऱ्या बैठकीचे संकेत दिले आहे. ट्रम्प यांनी याचे गुड न्यूज म्हणून वर्णन केले आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामाबदमध्ये होणाऱ्या चर्चेकडे लागले आहे.

US Iran Conflict : ‘युद्धविरामाची वेळ अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार’; इराण संर्घषावर व्हाईट हाऊसचे मोठे विधान, पुढील २४ तासांत काय घडणार?

ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतानुसार, येत्या ७२ तासांत अमेरिका इराण (Iran) दुसऱ्यांदा शांतता चर्चेच्या टेबलावर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी २२ एप्रिल रोजी समाप्त झालेली शस्त्रसंधी देखील वाढवली आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धबंदी अनिश्चित काशळासाठी वाढवल्याची घोषणा त्यांनी केली होती. इराणमधील राजकीय अस्थिरता पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. ट्रम्प यांनी इराणला शांततेचा ठोस प्रस्ताव करण्यासाठी  अतिरिक्त वेळ दिल्याचे अमेरिकेच्या व्हाईट हाउसने म्हटले होते.

व्हाईट हाउसची प्रतिक्रिया

व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी इराण संघर्षाबाबत बोलताना म्हटले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला शांततेचा ठोस प्रस्ताव सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. यानंतर त्या प्रस्तावर चर्चा आणि विचार करायचा की नाही, युद्धविराम लागू करायचा का नाही हे अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

लेविट यांनी हेही स्पष्ट केले की, सध्या इराणवर अमेरिकेने कडक नौदल नाकेबंदी आणि ऑपरेशन इकॉनॉमिर फ्युरी अंतर्गत आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. तसेच तोपर्यंत इराणवरील थेट लष्करी  कारवाई तात्पुरती स्थगित केली असल्याचे लेविट यांनी सांगितले.

इस्लामाबद ठरणार चर्चेचे केंद्र

दरम्यान अमेरिकेचे शिष्टमंडळ उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप इराणकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी दोन दिवस आधी होणारी चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. इराणने अमेरिका त्यांच्या जहाजांची नाकेबंदी थांबवत नाही तोपर्यंत चर्चा शक्य नसल्याचे म्हटले होते.

होर्मुझमध्ये तणाव कायम

एकीकडे ट्रम्प यांनी चर्चेची केलील घोषणा आणि दुसरकीडे इराणकडून अद्याप न मिळालेला प्रतिसाद यामुळे तणावात अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच इराणने होर्मुझ (Hormuz) वरील पकडही घट्ट केली असून जहाजांवर हल्ले सुरु केले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि उर्जा संकट अधिक गडद झाले आहे.

Drone War : अमेरिकेने टेकले गुडघे? ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्यासाठी युक्रेनचा आधार, स्काय मॅप’साठी पसरले हात

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराणमधील दुसऱ्या फेरीची शांतता चर्चा कधी आणि कोठे होणार आहे?

    Ans: अमेरिका इराणमधील दुसऱ्या फेरीची शांतता चर्चा ७२ तासांत पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे होणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहे. मात्र अद्याप इराणने यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही

  • Que: ट्रम्प यांनी युद्धबंदी का वाढवली आहे?

    Ans: इराणच्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि इराणला ठोस प्रस्ताव तयार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धबंदी वाढवली आहे.

  • Que: युद्धबंदी लागू असूनही इराणवर कोणते निर्बंध आहे?

    Ans: युद्धबंदी असूनही इराणच्या आर्थिक बंदरगाहला अमेरिकेने ताब्यात घेतले आहे.असे करुन इराणची आर्थिक नाकेबंदीचा डाव ट्रम्प खेळत आहेत.

Web Title: Us iran second peace talks to be held in islamabad will war stop 72 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.