US Iran Conflict : 'युद्धविरामाची वेळ अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार'; इराण संर्घषावर व्हाईट हाऊसचे मोठे विधान, पुढील २४ तासांत काय घडणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, अध्यक्ष ट्रम्पच इराण संघर्षाचा अंत ठरवणार आहे. सध्या इराणवर अमेरिकेने कडक नौदल नाकेबंदी आणि ऑपरेशन इकॉनॉमिर फ्युरी अंतर्गत आर्थिक निर्बंध लागू केले असल्याचेही लेविट यांनी सांगितले. अमेरिका हा दबा कायम राहणार असल्याचे व्हाईट हाउसने स्पष्ट केले आहे.
लेविट यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती समाधानी असून ट्रम्प यांनी इराणला जाणीवपूर्वक थोडी सवलत दिली. जेणेकरुन ते विचार करुन योग्य तो प्रस्ताव मांडतील. परंतु इराणने कोणताही प्रस्ताव मांडला तर त्यावर विचार करायचा का नाही, युद्धाची पुढील दिशा काय असेल याचा संपूर्ण अधिकारा हा ट्रम्प यांच्याकडेच असेल.
तोपर्यंत अमेरिका इराणी जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय घेणार नाहीत. तसेच तोपर्यंत इराणवरील थेट लष्करी कारवाई तात्पुरती स्थगित केली असल्याचे लेविट यांनी सांगितले आहे. परंतु इराणची होर्मुझ (Hormuz) समुद्रात नाकेबंदी रोखली जाणार नाही असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
अमेरिकन नौदलाने इराणच्या संपूर्ण बंदरावर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे इराणचा व्यापार ठप्प झाला असून प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे इराणने देखील चर्चेसाठी नकार दिला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की अमेरिका (America) त्यांची सागरी लूटमार जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा शक्य नाही.
व्हाईट हाऊसच्या मते, सध्या इराणच्या शासन आणि लष्करामध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. व्यावहारिक विचार करणारे नेते आणि कट्टरपंथी इस्लामिक यांच्यात संघर्ष सुरु आहे. इराणच्या विधानांमध्ये आणि चर्चेच्या टेबलावरील भूमिकेत विरोधाभास असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. आता सगळ्यांचे इराण (Iran) अमेरिकेच्या या दबावापुढे झुकणार की युद्ध आणखी चिघळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Currency War : डॉलर संकटात? UAE चा अमेरिकेला मोठा इशारा; तेल व्यापारासाठी ‘युआन’चा पर्याय तयार
Ans: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, युद्धविरामाची वेळ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार आहेत. इराणने प्रस्ताव मांडल्यावर त्यावर विचार करायचा का नाही, युद्धाची पुढील रणनीती काय असेल हे ट्रम्पच निश्चित करती असेही स्पष्ट केले आहे.
Ans: सध्या इराणकडून कोणाताही ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत अमेरिका इराणवर कोणतीही लष्करी कारवाई करणार नाही. परंतु राजनैतिक आणि सागरी दबाव कायम राहणार आहे.
Ans: इराणला लष्करीरित्या कमकुवत केल्यानंतर आता आर्थिकरित्या कमकुवत करण्याच अमेरिकेचा प्लॅन आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठीच ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी सुरु करण्यात आले आहे.






