Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: समुद्रात महासत्तेचा वेढा! 17 युद्धनौका, 10,000 सैनिक लढाऊ विमानांनी होर्मुझला विळखा; वाचा नेमकं काय घडतंय?

US सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने इराणविरुद्धच्या नाकेबंदीचा भाग म्हणून ३१ जहाजे परत पाठवली आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सामान्य वाहतूक सुरू होण्याची आशा कमी आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 23, 2026 | 10:33 AM
us navy blockade iran 31 ships sent back 10000 soldiers deployed 2026

us navy blockade iran 31 ships sent back 10000 soldiers deployed 2026

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची अभूतपूर्व नाकेबंदी
  • विशाल लष्करी फौजफाटा
  • होर्मुझमधील वाहतूक ठप्प

US Navy blockade Iran 2026 : मध्य-पूर्वेतील तणावाचे रूपांतर आता एका मोठ्या सागरी संघर्षात होताना दिसत आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध आपली सागरी नाकेबंदी (Naval Blockade) कमालीची कडक केली असून, यामुळे इराणचा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला तेल व्यापार संकटात आला आहे. युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अमेरिकन नौदलाने आतापर्यंत ३१ जहाजांना इराणी बंदरांकडे जाण्यापासून रोखले असून त्यांना माघारी परतण्यास भाग पाडले आहे. या कारवाईमुळे होर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धाच्या छावणीत रूपांतरित झाली आहे.

महासत्तेचा लष्करी ताफा: १७ युद्धनौका अन् १०,००० सैनिक

इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी अमेरिकेने केवळ कागदी नियम लादले नाहीत, तर प्रत्यक्ष समुद्रात मोठा फौजफाटा उतरवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने या मोहिमेसाठी १०,००० हून अधिक सैनिक आणि १७ हून अधिक शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामध्ये विमानवाहू जहाजे (Aircraft Carriers), गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर्स आणि अत्याधुनिक ड्रोन्सचा समावेश आहे. एवढेच नाही तर आकाशात १०० हून अधिक लढाऊ विमाने आणि निगराणी विमाने सतत गस्त घालत आहेत. कोणतीही चूक इराणला महागात पडेल, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून अमेरिकेने दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mont Saint Michel: विलोभनीय! दिवसातून दोनदा गायब होते ‘हे’ बेट; ‘येथे’ आहे 1300 वर्षांपासून समुद्राशी लपाछपी खेळणारं रहस्यमय शहर

होर्मुझमध्ये सन्नाटा: ३० जूनपर्यंत व्यापार पूर्ववत नाही?

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल पुरवठा वाहिनी मानली जाते. मात्र, १३ एप्रिलपासून सुरू असलेल्या या नाकेबंदीमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ३० जूनपर्यंत या मार्गावरील वाहतूक सामान्य होण्याची शक्यता जवळपास ‘शून्य’ आहे. अडवण्यात आलेली बहुतांश जहाजे ही तेलवाहू (Oil Tankers) आहेत. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इराण अमेरिकेच्या अटींनुसार वाटाघाटी करत नाही, तोपर्यंत एकही जहाज इराणी बंदरात शिरू शकणार नाही किंवा बाहेर पडू शकणार नाही.

US Central Command says 31 vessels have been redirected back to port or forced to turn around as part of the ongoing US blockade against Iran, with most identified as oil tankers. The move comes even after President Donald Trump extended a ceasefire with Tehran, signaling… pic.twitter.com/stIpXPLSnG — APT News (@APT__News) April 23, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Defense: इराणने अमेरिकेची खोड मोडली! 7 आठवड्यांत निम्मी क्षेपणास्त्रे संपली; पेंटागॉनने मांडला 2027चा सर्वात मोठा बजेट प्रस्ताव

ट्रम्प यांची रणनीती: शांतता चर्चा की आर्थिक युद्ध?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी युद्धविराम (Ceasefire) वाढवला असला तरी, त्यांनी इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी हटवण्यास साफ नकार दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही अमेरिकेची इराणला आर्थिकदृष्ट्या गुडघ्यावर आणण्याची एक दीर्घकालीन रणनीती आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेतून अद्याप कोणताही ठोस निकाल हाती आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत उभय देशांत करार होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील हा लष्करी तणाव कायम राहणार आहे. गुंतवणूकदारांमध्येही या अनिश्चिततेमुळे घबराट पसरली असून जागतिक तेल बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणची किती जहाजे अडवली आहेत?

    Ans: अमेरिकन सेंट्रल कमांडच्या अहवालानुसार, नौदलाने आतापर्यंत ३१ जहाजांना अडवून त्यांना बंदरात परतण्यास भाग पाडले आहे.

  • Que: होर्मुझमध्ये अमेरिकेने किती लष्करी बळ तैनात केले आहे?

    Ans: अमेरिकेने १०,००० सैनिक, १७ युद्धनौका आणि १०० हून अधिक लढाऊ विमाने या प्रदेशात तैनात केली आहेत.

  • Que: होर्मुझमधील सागरी व्यापार कधी सुरू होईल?

    Ans: सध्याच्या परिस्थितीनुसार, ३० जूनपर्यंत होर्मुझमधील वाहतूक सामान्य होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

Web Title: Us navy blockade iran 31 ships sent back 10000 soldiers deployed 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ
1

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ

US-Iran War: अमेरिकेचा इराणवर सलग 13 व्या रात्री भीषण हल्ले; होर्मुझच्या वादाने पेटले आखात, क्रूड ऑइल 100 डॉलर पार
2

US-Iran War: अमेरिकेचा इराणवर सलग 13 व्या रात्री भीषण हल्ले; होर्मुझच्या वादाने पेटले आखात, क्रूड ऑइल 100 डॉलर पार

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?
3

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

IRGC Attack THAAD: जॉर्डन आणि कुवेतमध्ये स्फोटांची मालिका; इराणच्या मिसाइलनी अमेरिकेच्या अभेद्य कवचालाच भेदले
4

IRGC Attack THAAD: जॉर्डन आणि कुवेतमध्ये स्फोटांची मालिका; इराणच्या मिसाइलनी अमेरिकेच्या अभेद्य कवचालाच भेदले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.