इराण युद्धात अमेरिकेची शस्त्रसामग्री झाली निम्मी; पेंटागॉनने २०२७ साठी केली वाढीव संरक्षण बजेटची मागणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Pentagon budget 2027 request 1.5 trillion : जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेला (America) इराणसोबतच्या संघर्षात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाला ७ आठवडे पूर्ण होत असतानाच, अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयातून म्हणजेच पेंटागॉनमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या भीषण युद्धामुळे अमेरिकेचा अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा आणि दारुगोळ्याचा साठा तब्बल ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. ही तूट इतकी मोठी आहे की, अमेरिकेला आता आपला २०२७ चा संरक्षण अर्थसंकल्प ऐतिहासिकरीत्या वाढवावा लागत आहे.
सीएनएन (CNN) आणि एपी (AP) च्या वृत्तानुसार, अमेरिकेने या सात आठवड्यांत आपली ४५ टक्के ‘प्रिसिजन गाईडेड’ (अचूक मारा करणारी) क्षेपणास्त्रे वापरून संपवली आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे इराणने पाठवलेले स्वस्त आत्मघाती ड्रोन्स पाडण्यासाठी अमेरिकेला आपली लाखो डॉलर्सची ‘पॅट्रियट’ आणि ‘थाड’ (THAAD) सारखी महागडी इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे वापरावी लागली. यामुळे अमेरिकेची हवाई संरक्षण प्रणाली आता एका चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. तज्ञांच्या मते, ज्या वेगाने ही क्षेपणास्त्रे वापरली जात आहेत, त्या वेगाने त्यांची पुन्हा निर्मिती करणे सध्याच्या घडीला अशक्य आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rajnath Singh : ‘वेळ आली की भारत करून दाखवेल’; राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका संघर्षात भारताच्या भूमिकेवरून दिले मोठे संकेत
या शस्त्रसाठ्याची पुनर्रचना करण्यासाठी पेंटागॉनने २०२७ साठी १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या भरघोस बजेटची मागणी केली आहे. यात केवळ दारुगोळ्यासाठी ३० अब्ज डॉलर्सची तरतूद आहे. विशेष म्हणजे, नौदलासाठी टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांची खरेदी ७८५ पर्यंत वाढवण्यात आली आहे, जी गेल्या वर्षी केवळ ५५ होती. यावरून युद्धाची तीव्रता आणि अमेरिकेची गरज स्पष्टपणे दिसून येते. तसेच, ४४,५०० अतिरिक्त सैनिकांची भरती करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे, ज्यामुळे अमेरिकन लष्कराचे बळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
New: The Trump administration’s record $1.5 trillion fiscal 2027 defense budget request is focused on financing an epic surge in spending to develop and procure a new generation of weapons, Pentagon officials told reporters. More than half the request, or in excess of $750… pic.twitter.com/khoTfoeUKm — Mark Satter (@marksatter) April 21, 2026
credit – social media and Twitter
इराणच्या ड्रोन तंत्रज्ञानाने अमेरिकेला जेरीस आणल्यामुळे आता अमेरिकेने आपला मोर्चा ड्रोन युद्धाकडे वळवला आहे. नवीन बजेटमध्ये आधुनिक ड्रोन आणि संबंधित तंत्रज्ञानावर ७४ अब्ज डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करण्यासाठी ‘काउंटर-ड्रोन’ प्रणालीकरिता स्वतंत्र २१ अब्ज डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे. १९६२ च्या जहाजबांधणी कार्यक्रमानंतरची ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी संरक्षण गुंतवणूक मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Insult : ‘तू मूर्ख आणि नीच स्त्री!’ रशियाच्या सरकारी टीव्हीवर जॉर्जिया मेलोनींचा भीषण अपमान; Russia-Italyमध्ये वाजलं
पेंटागॉनचे अधिकारी ज्युल्स हर्स्ट तिसरे यांनी स्पष्ट केले की, या बजेटमध्ये इराणशी संबंधित सध्याच्या अतिरिक्त कार्यवाही खर्चाचा समावेश नाही. याचा अर्थ असा की, जर युद्ध लांबले तर हा खर्च आणखी कित्येक पटीने वाढू शकतो. टोमाहॉकसारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वारेमाप वापर लष्करी तज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर अमेरिकेने तातडीने आपला शस्त्रसाठा भरला नाही, तर जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लष्करी वर्चस्वाला मोठी खीळ बसू शकते.
Ans: सात आठवड्यांच्या युद्धात अमेरिकेचा ५०% शस्त्रसाठा आणि ४५% अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे संपली आहेत.
Ans: पेंटागॉनने १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या ऐतिहासिक संरक्षण बजेटची मागणी केली आहे.
Ans: थाड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखते, तर पॅट्रियट कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि विमाने पाडण्यासाठी वापरली जाते. युद्धात या दोन्ही प्रणालींवर प्रचंड ताण आला आहे.






