US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्राध्यक्षांच्या इराणविरोधी लष्करी कारवाईला थांबवण्याची मागणी केली आहे. या युद्धविरोधी प्रस्ताला अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात २१५ पैकी २०८ मते मिळाली होती. ज्यामध्ये चार रिपब्लिकन खासरादारांनीही ठरावाच्या बाजूने डेमोक्रॅटिक पक्षाला साथ दिली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या पक्षातच इराण युद्धावरुन असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या ठरावाचा अमेरिकेच्या सैनिकी कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही असे व्हाइट हाऊसने सांगितले.
सध्या अमेरिका-इराणमध्ये ६० दिवसांची युद्धबंदीची घोषणा करण्यात आली असून दोन्ही देशांत शांतता चर्चेला सुरुवात झाली आहे. स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे शांतता चर्चेची पहिली फेरी यशस्वी पार पडली आहे. यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा लवकरच सुरु पूर्णपणे जगभरातील देशांसाठी खुली झाली आहे.
परंतु दोन्ही देशांमध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावरुन वाद कायम आहे. नुकतेच ट्रम्प यांनी इराणने अणुनिरीक्षणास परवानगी देण्यास नकार दिला, तर दोन्ही देशांमधील सुरू असलेली तांत्रिक चर्चा थांबवली जाईल’, असा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने त्यांना वैयक्तिकरित्या निरीक्षणाचे आश्वासन दिले असून शांतता चर्चा सकारात्मकपण सुरु आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. परंतु ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिका-इराण करारानुसार तीन महिन्यांहून अधिक काळानंतर पश्चिम आशियामध्ये प्रस्थापित झालेली शांतता पुन्हा धोक्यात आली आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कुवैत या देशांच्या दौऱ्यावर आहेत. याचा उद्देश अमेरिका-इराण शांतता करारावर या देशांचा संशय दूर करणे आहे.






