"कॅनडाचे..." जस्टिन ट्रुडो यांची पुन्हा बदनामी; डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली
नवी दिल्ली: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांची जस्टिन ट्रुडो यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ट्रुडोंना कॅनडाचे राज्यपाल म्हणून संबोधले आहे. गेल्या आठवड्यात फ्लोरिडामध्ये जस्टिन ट्रुडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. ट्रम्प यांनी कॅनडावर लावलेल्या 25 टक्के शुल्क संबंधित मुद्दयावर चर्चा या भेटीदरम्यान करण्यात आली.
कॅनडाला अमेरिकेचा 51वां भाग बनवा
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांवर कठोर शुल्क लावणार असल्याचे म्हटले होते. विशेष करुन कॅनडातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% शुल्क लादला होता. त्यांनतर या विषयावरील वाद सोडवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथे ट्रम्प यांची भेट घेतली होती.
मात्र, यावेळी ट्रम्प यांनी कॅनडाच्या व्यापार धोरणांवर टीका करत, जर कॅनडाने अमेरिकेशी व्यापारातील तफावत दूर केली नाही, तर अमेरिकेचा भाग बनण्याचा विचार करावा, असा सल्ला ट्रुडोंना सुचवले.अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वा राज्य होण्याचा सल्ला दिल्याने दोन्ही देशांमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. यावर ट्रुडो काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कॅनडाचे राज्यपाल
त्यानंतर या संदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, “काही दिवसांपूर्वी ‘ग्रेट स्टेट ऑफ कॅनडाचे’ गव्हर्नर जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत डिनर करण्याचा आनंद झाला.” डिनर दरम्यान, ट्रूडो यांनी चेतावणी दिली की 25 टक्के दर लागू केल्याने कॅनडाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. यावर त्यांनी ट्रम्प यांनी सुचवले होते की, कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवा. मात्र, जस्टिन ट्रुडोंनी यावर अद्याप कोणतही प्रतिक्रीया दिलेली नाही.
त्यांनतर ट्रम्प यांनी मागील आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा एका पोस्टमध्ये या मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे. यामध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “मी लवकरच राज्यपालांशी पुन्हा भेट घेण्यास उत्सुक आहे जेणेकरुन आम्ही टॅरिफ आणि व्यापारावर आमचे सखोल संभाषण सुरू ठेवू शकू, ज्याचे सर्वांसाठी खरोखर चांगले परिणाम होतील!”. सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय बनली असून याआधी केलेल्या पोस्टशी सुसंगत आहे.