ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर चीनमध्ये दाखल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिकेत दरारा! थेट कपाळावर पासपोर्ट चिटकवून फिरतायेत लोक VIDEO VIRAL
ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा उद्देश दीर्घकाळापूसन ताणलेल्या चीनशी संबंधांना पुनर्संचयित करणे आहे. शिवाय गेल्या काही काळात केयर स्टारमर यांची लोकप्रियता अत्यंत कमी झाली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत असंतुलन निर्माण होत आहे. यामुळे ब्रिटन आणि चीनमध्ये आर्थिक, औषधनिर्मिती, ऑटोमोबाईल्स आणि इतर क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढवणे आहे. ही दोन्ही देशांतील व्यापाराल चालना देण्यासाठी सुवर्णसंधी आहे. शिवाय याच वेळी अमेरिकेच्या आक्रमक धोरणांना देखील प्रत्युत्तर देण्याची तयारी ब्रिटन करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यापूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देखील चीनला भेट दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असून यामागे ट्रम्प प्रशासनाची आक्रमक धोरणे, परराष्ट्र देशांवरील टॅरिफचा दबाव, जागतिक संस्थांमधील माघार कारणीभूत आहे. कारण यामुळे पाश्चत्य देशांची अमेरिकेवरील विश्वार्हता कमी होत असून त्यांचा झुकाव चीनकडे वाढत आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान केयर स्टारमर यांनी देखील चीन दौऱ्याबद्दल बोलताना म्हटले होते की, हे मुर्खपणाचे आहे, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा दौरा महत्त्वाचा आहे.
शिवाय याच वेळी युरोपीय देशांनी देखील अमेरिका सोडून भारताशी हातमिळवणी केली आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये (EU) मोठा मुक्त व्यापार करार झाला आहे. यामुळे भारतासाठी युरोपमध्ये मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतावरील विश्वास वाढत आहे. युरोपच्या मते भारताशी व्यापार हा जागतिक संतुलनासाठी फायदेशीर ठरत आहे.
UK PM Starmer arrives in China. pic.twitter.com/sP2bUfSx2a — Open Source Intel (@Osint613) January 28, 2026
Ans: या दौऱ्याचा उद्देश चीन आणि ब्रिटनमदील बिघडलेले संबंध सुधारणे आणि दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक गुंतवणूक वाढवणे आहे,
Ans: या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर, राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे.






