Photo Credit- Social Media बांगलादेशात का होतायेत हिंदुंवर अत्याचार
ढाका: गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंसाचार उफाळला आहे. बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत असा दिवस जात नाही. बांगलादेशात 1 कोटी 31 लाख हिंदूंच्या जीवाला धोका आहे. कधी मंदिरे पाडली जात आहेत, तर कधी पुतळे तोडले जातात, हिंदू प्रतीकांची विटंबना केली जात आहे, निषेध करणाऱ्या हिंदूंच्या हत्या केल्या जातात. अनेक व्हिडिओ असे आहेत जे पाहताही येणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये हिंदूंवर क्रूरता कळस गाठत आहे. हल्ले आणि धमक्यांची तीव्रता वाढत आहे. पण बांगलादेशात हा हिंसाचार का उफाळला, त्यामागे नेमक कोण आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहे, या हल्ल्यामागे एक नाव आहे ते जमात-ए-इस्लामीचे. बांगलादेशातील 10 पैकी 9 हल्ल्यांमागे जमात-ए-इस्लामीचे नाव आहे. बांग्लादेशच्या या कट्टरतावादी गटाबद्दल आणि त्याच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या असून त्यांच्या हिंसाचाराला तेथील हिंदू बळी पडत आहेत.
जमात-ए-इस्लामी स्थापन करण्यामागचा हेतू काय होता? बांगलादेशात ही संघटना कोणी सुरू केली? ती हिंदूंचा इतका द्वेष का करते? त्यांची पुढील योजना काय आहे? आजकाल असे अनेक प्रश्न बांगलादेशाबद्दल आस्था असलेल्या लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या हेलिकॉप्टरने ढाका ते दिल्लीला उड्डाण करताच जमात-ए-इस्लामी संपूर्ण जगाची सर्वात मोठी हेडलाईन बनली होती. जमातचे मथळे हिंदू, इंग्रजी, बंगाली, उर्दू अशा प्रत्येक भाषेत प्रसिद्ध झाले. ढाक्याच्या रस्त्यावर हिंदूंचे रक्त वाहू लागले आणि जमात-ए-इस्लामी हा रक्तरंजित सोशल मीडियावर टॉप ट्रेंड झाला. शेख हसीना निघून जाताच कट्टरपंथीयांची फौज हातात शस्त्रे घेऊन हिंदूंचा नाश करायला निघाली.
जमात-ए-इस्लामीची मूळ संघटना भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ऑगस्ट 1941 मध्ये स्थापन झाली. इस्लामिक तत्वज्ञानी अबुल आला मौदुदी यांनी लाहोरच्या इस्लामिया पार्कमधून याची सुरुवात केली. इस्लामचा प्रचार करणे हे त्याचे सुरुवातीचे उद्दिष्ट होते. संपूर्ण जगात इस्लामचा प्रसार करणे आणि जास्तीत जास्त लोकांना जोडणे हा संस्थेचा उद्देश होता. 1941 ते 1946 पर्यंत जमात-ए-इस्लामीने संपूर्ण भारतात इस्लामचा प्रचार सुरू ठेवला. ही संघटना संपूर्णपणे अखंड भारताला समर्पित होती. जमात-ए-इस्लामी ही पहिली मुस्लिम संघटना होती जिने भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तानला वेगळे करण्यास विरोध केला. 1946 च्या निवडणुकीत मुस्लिम लीगला पाठिंबा दिला नाही.
भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तान हा वेगळा देश बनला. त्यानंतर 1971 च्या लढाईत पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि त्याचे नाव बांगलादेश असे पडले. या संघटनेचे दोन वेगवेगळे भाग झाले. भारतात जमात-ए-इस्लामी हिंद संघटना राहिली, तर पाकिस्तानमध्ये जमात-ए-इस्लामी पाकिस्तानची संघटना स्थापना झाली. भारतात जमात कायद्याच्या कक्षेत राहून धर्माचा प्रचार करण्यात गुंतलेली असताना पाकिस्तानातील जमात पूर्णपणे कट्टरवाद्यांच्या ताब्यात आली. संपूर्ण समुदाय पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंविरुद्ध हिंसाचार आणि धर्मांतर यांसारख्या कारवायांमध्ये सामील झाला. पश्चिम पाकिस्तानातील बहुतेक हिंदूंनी जमातसारख्या संघटनांच्या दबावाखाली एकतर धर्मांतर केले किंवा देश सोडला, परंतु पूर्व पाकिस्तानमध्ये ते हिंदूंच्या मोठ्या लोकसंख्येवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि याची वेदना कट्टरवाद्यांच्या मनात अजूनही आहे.
PKL 11 : रोमांचक सामन्यात गुजरात जायंट्सची यू-मुम्बाला शिकस्त; अखेरच्या टप्प्यात सामना
महम्मद युनूस यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्याच देशात, त्यांच्या नाकाखाली, जमात-ए-इस्लामी हिंदूंच्या वंशाचा नाश करण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करला आहे. बांगलादेशातील प्रत्येक हिंदूमध्ये सध्या घबराटीचे वातावरण असताना मोहम्मद युनूस आपल्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. त्यामुळे या जमातीकडे अशी कोणती शक्ती आहे की त्यांनी महम्मद युनूस यांचे तोंड बंद केले आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये जमातवर बराच काळ बंदी घालण्यात आली होती. पण शेख हसीना यांनी देश सोडताच त्यांच्यावरील जमातवर लावण्यात आलेली बंदी लगेचच उठवण्यात आली आणि हिंदूंवरील हल्ले अधिक तीव्र आणि वेगाने होऊ लागले. त्याविरुद्ध बोलणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे, यावरूच जमातचे आजच्या बांगलादेशात किती वर्चस्व आहे, याचा अंदाज यावरून लावता.
भारताने जो बांगलादेश पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला, आज त्याच बांगलादेशावर ताबा मिळवलेल्या जमातच्या जिहादींना पाकिस्तान, तिची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे. पाकिस्तान जिहादींना पैसे पाठवतो, आयएसआय भारतविरोधी स्क्रिप्ट लिहिते आणि या जिहादींना पाकिस्तानच्या दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच बांगलादेशातील जमातचे कट्टरपंथी हिंदुविरोधी आणि भारतविरोधी वातावरण निर्माण करतात आणि हे सर्व करण्यासाठी मौलानांचं सैन्य उतरवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर जमात कट्टरपंथी संपूर्ण नियोजन करून हिंदूंवर हल्ले करत आहेत.






