Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण

World News : इराणने होर्मूझ सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू सत्तेत असेपर्यंत होर्मूझ खुला केला जाणार नसल्याची भूमिका इराणकडून मांडण्यात आली आहे. जगातील महत्त्वाच्या तेल आणि ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मूझमधील तणावामुळे आखाती देशांमधील व्यापारावर परिणाम होणार आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 18, 2026 | 04:15 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यावर विशेष राग का आहे ?
  • होर्मूझ महत्वाचा का ?
  • युद्ध का थांबत नाही
World News : तीन दिवसांत इराण मधील सत्तारूढ सरकार घालवून आपल्याला हवे ते सरकार आणू शकतो असे सांगून ट्रम्प यांना म्हणजेच अमेरिकेला इराण सोबत युद्ध करायला लावूले . तीन दिवसांचे म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु झालेले युद्ध आज १८ सप्टेंबर २०२६ मध्ये ही सुरु आहे . म्हणजेच तब्बल २०२ दिवस पूर्ण झाले आहेत . आणि आज २०३ वा दिवस सुरु आहे . तरी इराण अजून शरण किंवा पराजित होत नाही आहे .

ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यावर विशेष राग का आहे ?

या युद्धाची किंमत ही इस्रायल आणि अमेरिकेला जेवढी चुकवावी लागत आहे . त्यापेक्षा जास्त किंमत इराण चुकवत आहे . कारण आधीच जवळपास दोन दशकांपेक्षा जास्त काळ अमेरिकेने आपली सत्ता वापरून इराणवर आर्थिक नाकेबंदी केली आहे . तसेच परदेशी बँका मधील इराणची गुंतवणूक आणि मालमत्ता यावर बंदी घातली आहे .

तसेच यामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक टंचाईला तोंड देत असतानाच नेतन्याहू आणि ट्रम्प यांनी इराणवर पहिला हल्ला करून हे एकाअर्थी युद्ध इराणवर लादले आहे . त्यामुळे इराणवर अजूनच आर्थिक ताण वाढला असून इराणच्या चलनाची किंमत अजून कमी झाली आहे . महागाई वाढली आहे .

नेतन्याहू आणि ट्रम्प फक्त यावरच थांबले नाहीत , या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने बरेच युद्धाचे नियम मोडले आहेत . इराणमधील मोठे मोठे शास्त्रज्ञ , सरकारी अधिकारी , इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना टार्गेट करून त्यांचा खून केला गेला आहे . हे करून सुद्धा नेतन्याहू आणि ट्रम्प ट्रम्प थांबले नाहीत .

त्यांनी एका शाळेवर मिसाईल हल्ला करून एका क्षणात तब्बल १२० लहान मुलांचा जीव घेतला आहे .या सगळ्या कृत्यांमुळे नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यावर इराणचा विशेष राग असल्याचे बोलले जात आहे .

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

होर्मूझ महत्वाचा का ?

जगाच्या तेलाच्या वाहतुकीपैकी जवळपास २० टक्के सागरी वाहतूक ही फक्त होर्मूझ या मार्गावरून होते . होर्मूझ ची भौगोलिक रचना पाहिल्यास एका बाजूला ओमान आणि दुसऱ्या बाजूला इराण असे देश लागतात . आणि या दोन्ही देशांच्या जमिनीवरून सहजपणे हल्ला करून हा मार्ग बंद पाडता येतो .

तेव्हा यामधून आखाती देशांतील तेल व्यवसाय हा बऱ्यापैकी अवलंबून असल्याने होर्मूझ महत्वाचा आहे . अमेरिकेने होर्मूझ वर आपले पूर्णपणे कंट्रोल असल्याच्या कितीही कागाळ्या केल्या तरी होर्मूझ मधून फक्त इराण आणि चीन यांच्यात व्यवस्थित व्यापार सुरु असल्याचे दिसून आले आहे .

कारण चीनसोबत प्रत्यक्ष लढाई आता अमेरिकेला करता येत नाही . चीन आता पूर्वीचा चीन राहिला नाही . त्यामुळे होर्मूझ बंद असलातरी इराण चीन ला काहीही फरक पडत . पण इतर जगाला मात्र होर्मूझ लवकर उघडावा याची गरज आहे . कारण युद्धापूर्वी कच्च्या तेलाच्या ज्या किमती होत्या त्या आता दुप्पट झाल्या आहेत .

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

युद्ध का थांबत नाही

युद्ध थांबवण्याची इच्छा खरं तर तिन्ही देशांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर सगळ्या देशांची सुद्धा आहे . अमेरिका आणि इस्राइल यांचे महागड्या मिसाईल वापरून कंबरडे मोडले आहे . मागेच पेंटागॉन ने युद्ध खर्चा बाबत विधान केले होते . अमेरिकेत इराण विरोधातील युद्ध हे आपले युद्ध नसल्याची भावना देखील तीव्र होत चालली आहे .

पण ट्रम्प यांना आता अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकी आधी युद्ध थांबवल्यास युद्धात काय मिळवले असे उत्तर द्यावे लागेल . जगभरात अमेरिका पुन्हा युद्धात हारली अशा चर्चा सुरु होऊन निवडणुकीमध्ये सपाटून हार मिळेल आणि कदाचित ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागेल .

म्हणून ट्रम्प हे युद्ध थांबवत नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात . तर दुसरीकडे नेतन्याहू यांच्या बाबतही हेच आहे . युद्ध बंद झाल्यास नेतन्याहू यांच्यावर इस्रायल मध्ये भ्रष्टचार याच्या आरोपाखाली त्यांच्यावर कोर्टात केसेस सुरु आहेत . तर दुसरीकडे इस्रायल मध्ये पंतप्रधान पदाच्या निवडणुका होणार आहेत .

त्यामुळे युद्ध सुरु असताना राष्ट्रीय भावनेखाली आणखी वेळ मिळत असून हे युद्ध अजून सुरूच राहणे दोघांसाठीही जरुरीचे बनले आहे . भले या युद्धात सामान्य निष्पाप नागरिक मारले का जाईनात .

 

Web Title: World news an unalterable factthe strait of hormuz will remain closed as long as trump and netanyahu are in power iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • America news
  • Iran News
  • Israel
  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Top Marathi News Today
  • World news

संबंधित बातम्या

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का
1

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग
3

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
4

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.