Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत

US Iran Conflict : इराणमध्ये सध्या खामेनेई सरकारविरोधात आंदोलन उग्र झाले आहे. मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याने अमेरिकेने इराणधील आपल्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे युद्धाची भिती निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2026 | 10:32 AM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • इराणमधील सरकारविरोधी आंदोलन तीव्र भडकले
  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा  नागरिकांना इराण सोडण्याचा तातडीचा इशारा
  • युद्धाची चाहूल?
US Iran Conflict : वॉशिंग्टन/तेहरान : सध्या इराणमध्ये (Iran) हिंसक आंदोलनामुळे प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे. इराणची जनता खामेनेई सरकारविरोधात आणि राजेशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यांवर उतरली आहे. देशातील आर्थिक संकट, वाढती महागाई विरोधात हे आंदोलन सुरु झाले होते. पण यावर तोडगा काढण्याऐवजी खामेनेई सरकारने सुरक्षा दलांना आंदोलकांवर कडक कारवाईचे आदेश दिले. ज्यामुळे सुरक्षा दलांनी आंदोलकांना चिरडण्यासाठी बळाचा वापर केला आणि आंदोलन तीव्र भडकले.

Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

मीडिया रिपोर्टनुसार, इराणमध्ये सध्या सुरक्षा दलांच्या गोळीबार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार प्रचंड वाढला आहे. दगडफेक आणि गोळीबार केला जात आहे. यामध्ये काही सरकारसमर्थ नागरिकही सहभागी झाले आहेत. सध्या परिस्थिती अत्यंत भयावह झाली असून रस्ते, सार्वजनिक ठिकाणे सगळे काही बंद आहे. शिवाय इंटरनेट आणि फोनसेवा बंद असल्याने घटनांची स्पष्ट माहिती मिळणे कठीण झाले आहे.

 अमेरिकेने नागरिकांना इराण सोडण्याचे दिले आदेश

दरम्यान याच तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने (America) इराणमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्याचे किंवा सुरक्षित ठिकाणी लपण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या दूतावासाने व्हर्च्युअल सुचना जारी करत आपल्या नागरिकांना इराण, आर्मानिया, तुर्की सोडून इतर देशांमध्ये जाण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे की, इराणमधील निदर्शने वाढत चालली आहेत आणि ती अधिक हिंसक होऊ शकतात. यामुळे अमेरिकन नागरिकांनी तातडीने इराणमधून बाहरे पडावे. तसेच दूतावासाशी संपर्क करण्यासाठी इंटनेट सोडून पर्यायी मार्ग शोधण्याचेही या सुचनेत सांगण्यात आले आहे.

इराणवर हल्ला करणार अमेरिका?

दरम्यान मिडिया रिपोर्टनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणवर हल्ला करण्याचे आदेश देणार असल्याचे संकेत मिळाले आहे. व्हाइट हाइसने संकेत दिले आहेत की, अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या प्रस्तांववर सध्या चर्चा करत आहेत. याच शिवाय अमेरिकेच्या B-52 बॉम्बर्स आणि इंधने भरणारी लष्करी विमाने इराणच्या जवळ पाहिली गेली आहेत. या हालचालींमुळे सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिका इराणवर लवकरच हल्ला करणार आहे. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल लागली आहे.

इराणवर आर्थिक दबाव

याशिवाय ट्रम्प यांनी इराणवर आर्थिक दबावही वाढवला आहे. ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के कराची (Tarrif) घोषणा केली आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या तणावाचा जागतिक पातळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणमधील नागरिकांना देश सोडण्याचे आदेश का दिले आहेत?

    Ans: इराणमध्ये सध्या हिंसक निदर्शने सुरु आहेत. दगडफेक आणि वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकेन नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: अमेरिका इराणवर बॉम्ब हल्ला करणार असल्याचे कोणते संकेत मिळाले आहेत?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिका इराणवरील हल्ल्याच्या पर्यायांवर चर्चा करत असल्याचे संकेत मिळाले आहे. तसेच इराणजवळ B-52 बॉम्बर्स आणि इंधने भरणारी लष्करी विमाने पाहिली गेली आहेत.

  • Que: अमेरिकेने इराणवर आर्थिक दबाव कसा वाढवला आहे?

    Ans: अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ लागू केले आहे.

Web Title: World war 3 us iran conflict usa issues advisory to us citizens to leave iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
1

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.