Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या निदर्शनांदरम्यान सोशल मीडियावर खानेमेईंचा फोटो जाळून त्याने सिगारेट पेटवण्याऱ्या एका मुलीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या महिलेच्या धाडसी कृत्यामुळे सोशल मीडियावर आणि जगभरात मोठी खळबळ उडाली होती. या महिलेला सध्याच्या घडामोडीला सुरु असलेल्या आंदोलनाचा चेहरा मानला जात होते. परंतु या फोटोमागचं सत्य वेगळे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये असलेली महिला ही मोर्टिसिया ॲडम्स आहे. ही महिला इराणची नसून कॅनडाची आहे. मोर्टिसिया एक ऑनलाइन ॲक्टिव्हीस्ट आणि राजकीय टीकाकार म्हणून ओळखली जाते. ती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून राजकीय घडामोडींवर भाष्य, टीका करपत असते. सोशल मीडियावर तिचे 10 हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. मार्टिसिया मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी आवाज उठवते.
सोशल मीडिया मोर्टिसिया ॲडम्सचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सध्या सुरु असलेल्या निदर्शनांमध्ये ही महिला असून तिने खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु यामागचे सत्य काही वेगळेच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्टिसियाचा व्हायरल होणार फोटो हा 2023 सालचा आहे. 2023 मध्ये महसा अमिनीहिच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये काढण्यात आला होता. त्या काळात जगभरात आंदोलन झाले होते. व्हायरल होत असलेला मोर्टिसियाचा फोटो हा या आंदोलनांपैकी कॅनडाच्या रॅलींमधील आहे.
सध्या इराणमध्ये खामेनेई सरकाविरोधात जनते तीव्र आक्रोश वाढत आहे. वाढती महागाई आणि आर्थिक संकटामुळे सुरु झालेल्या या निदर्शनांनी आता रौद्र रुप घेतले आहे. इराणमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणच्या सरकारने यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.
Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ
Ans: खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवणारी तरुणी ही ऑनलाइन ॲक्टिव्हीस्ट असून मोर्टिसिया ॲडम्स असे तिचे नाव आहे.
Ans: इराणच्या निदर्शनांमध्ये खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवणाऱ्या महिलेचा फोटो हा 2023 मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर झालेल्या कॅनडातील आंदोलनातील आहे.
Ans: इराणमध्ये सध्या प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटामुळे खामेनेई सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यांवर उतरले आहेत.






