न्यूयार्कमध्ये काल एका कार्यक्रमात लेखक सलमान रश्दींवर हल्ला करण्यात आला. मागील 12 तासापासून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृती बद्दल आता अपडेट समोर आली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे.
[read_also content=”देशाचे स्वातंत्र्य आबाधित ठेवणे वर्तमानातील आव्हान : पृथ्वीराज चव्हाण https://www.navarashtra.com/maharashtra/the-current-challenge-is-to-prevent-the-freedom-of-the-country-prithviraj-chavan-nrdm-315553.html”][blurb content=””]
न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मागील 12 तासंपासून भारतीयवंशाचे ब्रिटीश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी व्हेटिलेटवर आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. रश्दींचे एजंट अँड्र्यू यील यांनी सांगितले की, ‘रश्दींना बोलण्यास त्रास होत आहे. तसेच त्यांचा एक डोळा पूर्णतः निकामी होण्याचीही शक्यता आहे. त्यांच्या यकृताला गंभीर जखम झाली आहे. तसेच त्यांच्या हाताच्या रक्तवाहिन्याही कापल्या गेल्या आहेत.’सध्या सलमान रश्दी न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून, ते व्हेंटिलेटवर आहेत. शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ते येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
[read_also content=”भारतात आता VLC Media Player वापरता येणार नाही! सरकारचा मोठा निर्णय https://www.navarashtra.com/india/vlc-media-player-can-no-longer-be-used-in-india-big-decision-of-govt-nrps-315531.html”]
या कार्यक्रमाला हजर असलेल्या चार्ल्स सेव्हेनर यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले -एक व्यक्ती व्यासपीठावर धावत आला आणि त्यांनी सलमान रश्दींच्या गळ्यावर चाकूने वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तेथील सर्वचजण थक्क झाले. कोणालाही काहीच समजले नाही. हल्लेखोराने अवघ्या 20 सेकंदांतच रश्दींवर 10 ते 15 वार केले. या हल्ल्यानंतर रश्दी व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ प्रथमोपचार करुन लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले.