China: शी जिनपिंगनंतर जनरल झांग शेंगमिन चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती; सोपवण्यात आल्या ३ मोठ्या जबाबदाऱ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जागतिक राजकारणात आणि विशेषतः चीनच्या (China) राजकीय वर्तुळात सध्या एकाच नावांची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जनरल झांग शेंगमिन. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशातील सर्व प्रस्थापित परंपरा आणि नियमांना बाजूला सारत लष्कराचे उप-कमांडर झांग शेंगमिन यांची थेट कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्था असलेल्या ‘पॉलिटब्युरो’वर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्यांची निवड सामान्यतः पक्ष अधिवेशनात केली जाते. पुढील अधिवेशन २०२७ मध्ये होणार असतानाही, शी जिनपिंग यांनी ही प्रतीक्षा न करता शेंगमिन यांना थेट ही मोठी जबाबदारी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शी जिनपिंग यांच्यानंतर झांग शेंगमिन हे चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत.
सध्याच्या घडीला शेंगमिन हे चीनमधील एकमेव अशा जनरल आहेत, ज्यांच्याकडे उपराष्ट्रपतीपदाचा दर्जा असून ते थेट पॉलिटब्युरोचे सदस्यही आहेत. गेल्या वर्षभरात चिनी सैन्यातील उच्चपदस्थ जनरल्सवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सातपैकी पाच जनरल्सना पदावरून हटवण्यात आले आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि उलथापालथीच्या काळात झांग शेंगमिन यांच्याकडे चीनच्या लष्करी आणि राजकीय यंत्रणेची कमान सोपवण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय विश्लेषकही अवाक झाले आहेत.
फेब्रुवारी १९५८ मध्ये शांक्सी प्रांतात जन्मलेले झांग शेंगमिन वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी चिनी सैन्यात दाखल झाले. सुरुवातीला अत्यंत सामान्य सैनिकाच्या रूपात काम करणाऱ्या शेंगमिन यांचे नशीब २०१० मध्ये पालटले. २०१० मध्ये आलेल्या एका भीषण भूकंपाच्या वेळी त्यांनी भूकंपाचे निवारण करणाऱ्या विशेष पथकाचे यशस्वी नेतृत्व केले होते. या कामगिरीमुळे ते वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या नजरेत आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tsar Bomba : जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब फुटला; 900 किमी दूर फुटल्या काचा, पृथ्वी तीन वेळा हादरली
२०१३ मध्ये शी जिनपिंग चीनच्या सत्तेवर आल्यानंतर, झांग शेंगमिन यांना एकामागोमाग एक मोठ्या जबाबदाऱ्या आणि पटलावर भरघोस बडत्या मिळत गेल्या. शी जिनपिंग यांच्या अतिशय जवळच्या आणि विश्वासू वर्तुळात त्यांची गणना होऊ लागली. चिनी सैन्यामध्ये प्रचंड प्रमाणावर पसरलेला भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढण्यासाठी शी जिनपिंग यांनी झांग यांच्यावर लष्कराच्या शिस्तपालन समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी ही जबाबदारी अतिशय कडक पद्धतीने पार पाडली.
भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना, झांग शेंगमिन यांनी चिनी सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली. त्यांच्या या धडक कारवाईमुळे सैन्यातील तब्बल सात जनरल्सना आपली नोकरी आणि पदे गमवावी लागली. इतकेच नाही तर, झांग यांच्या या भूमिकेमुळे चिनी सैन्याचे उपाध्यक्ष झांग युशिया यांनाही अडचणींचा सामना करावा लागला आणि आपली नोकरी गमवावी लागली. या संपूर्ण कारवाईवरून शेंगमिन यांची शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासक म्हणून ओळख निर्माण झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics: ‘रशियाविरोधात बोलू नका’, अमेरिकेचा बाल्टिक देशांना संयम बाळगण्याचा सल्ला, नेमके काय घडले?
यावर्षी त्यांची चीनच्या १९व्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली होती. सध्या ६७ वर्षांचे असलेले झांग हे चिनी सैन्यात सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. चिनी सैन्याच्या संरचनेनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख असतात, त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा क्रमांक लागतो. सहसा या पदावर दोन व्यक्ती असतात, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून झांग हे एकटेच हे पद सांभाळत आहेत. आता त्यांना पॉलिटब्युरोमध्ये स्थान मिळाल्यामुळे त्यांचे प्रशासकीय आणि राजकीय वजन कैक पटीने वाढले आहे.
Ans: शी जिनपिंग यांनी नियमांना शिथिल करत झांग शेंगमिन यांची कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्था असलेल्या 'पॉलिटब्युरो'वर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
Ans: झांग शेंगमिन यांचा जन्म फेब्रुवारी १९५८ मध्ये झाला असून, २० व्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. त्यांनी सैन्यातील भ्रष्टाचारविरोधी शिस्तपालन समितीचे प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Ans: ते सध्या चिनी सैन्यातील एकमेव जनरल आहेत ज्यांच्याकडे उपराष्ट्रपतीचा दर्जा असून, ते पॉलिटब्युरोचे सदस्य आहेत. त्यामुळे शी जिनपिंग यांच्यानंतर ते सर्वात शक्तिशाली व्यक्ती ठरले आहेत.






