Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War: काहीतरी भयानक घडणार! अमेरिकेला इशारा अन् ‘या’ बलाढ्य देशाची इराणला मदतीची घोषणा, आता…

इराण आणि इस्त्रायल यांच्यात 13 जून पासून संघर्षाला सुरुवात झाली आहे. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इराणच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2025 | 08:00 PM
Israel-Iran War: आता काहीतरी भयानक घडणार! अमेरिकेला इशारा अन् 'या' बलाढ्य देशाची इराणला मदतीची घोषणा; तिसरे महायुद्ध

Israel-Iran War: आता काहीतरी भयानक घडणार! अमेरिकेला इशारा अन् 'या' बलाढ्य देशाची इराणला मदतीची घोषणा; तिसरे महायुद्ध

Follow Us
Close
Follow Us:

Yemen: इराण आणि इस्त्रायल यांच्यात 13 जून पासून संघर्षाला सुरुवात झाली आहे. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इराणच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रांवर मोठे हल्ले केले. तर इराणने रशियाकडे मदत मागितली होती. मात्र रशियाने या प्रकरणात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक देश इराणच्या मदतीला धावून आला आहे.

इराणसोबत आम्ही युद्धात सहभागी होत असल्याचे येमेन देशाने सांगितले आहे. येमेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या युद्धात इराणसोबत सहभागी असल्याचे सांगितले आहे. येमेन देशाच्या घोषणेमुळे आता इस्त्रायल इराण संघर्ष मोठे वळण घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या महायुद्धाची तर ही सुरुवात नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

रशियाने इराणची मदत करण्यास नकार दिला आहे. इस्त्रायल इराण वादात रशियाने तटस्थ भूमिका घेतली आहे. येमेन देशाने अमेरिका आणि इस्त्रायल देशांना त्यांची जहाजे आमच्या सागरी सीमेपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यावर येमेन देशाने ही अधिकृत भूमिका घेतली आहे.

अमेरिका आणि इस्त्रायल ही दोन्ही देश एकत्र असल्यास धोकादायक ठरू शकतात असे येमेनचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या मदतीने इस्त्रायल तणाव निर्माण करत आहे. आम्ही त्या दोन्ही देशांना यांच्या सागरी सीमेपासून दूर राहण्याचा सल्ला देतो आहोत. नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील.

इराणने घेतला बदला; 40 मिनिटे इस्त्रायलवर केला महाभयानक हल्ला

इराण आणि इस्त्रायलमध्ये प्रचंड मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात अमेरिकेने देखील उडी मारली आहे. अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रावर हल्ला केला आहे. त्याचा बदला म्हणून इराणने सिरियामध्ये अमेरिकेचे असणाऱ्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. तर इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा बदला इराणने घेतला आहे. इस्त्रायलवर तब्बल 40 मिनिटे महाभयानक अशी क्षेपणास्त्र डागली आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Israel-Iran War: इराणने घेतला बदला; 40 मिनिटे इस्त्रायलवर केला महाभयानक हल्ला, VIDEO पाहून…

इराणचा अमेरिकेवर हल्ला

अखेर इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इराणी माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्याच्या ३६ तासांनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीरियातील अमेरिकेच्या तळावरील हल्ला हा इराणकडून पहिला हल्ला मानला जात आहे. मात्र अद्याप इराणने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हल्ल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यांनी सांगितले होते की, मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात येईल.

Web Title: Yemen announced help to iran about israel and usa war world marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • USA
  • World news

संबंधित बातम्या

जागतिक इंधन भडका! इराण-इस्रायल युद्धामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ; नेपाळ, बांगलादेश आणि इतर देशांनीही वाढवले दर
1

जागतिक इंधन भडका! इराण-इस्रायल युद्धामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ; नेपाळ, बांगलादेश आणि इतर देशांनीही वाढवले दर

US Iran War : इराणशी पंगा ट्रम्प यांना पडला भारी! मध्यपूर्वेतील १३ अमेरिकन तळं उद्ध्वस्त, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
2

US Iran War : इराणशी पंगा ट्रम्प यांना पडला भारी! मध्यपूर्वेतील १३ अमेरिकन तळं उद्ध्वस्त, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

US Iran War : ‘Welcome To Iran, Habibi’ ; अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं; VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा
3

US Iran War : ‘Welcome To Iran, Habibi’ ; अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं; VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा

Explainer: Hormuz च्या मार्गावरून निघणं जहाजांसाठी का आहे कठीण? Iran लष्कराची नेमकी भूमिका काय
4

Explainer: Hormuz च्या मार्गावरून निघणं जहाजांसाठी का आहे कठीण? Iran लष्कराची नेमकी भूमिका काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.