• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Seniour Actor Raja Murad Reaction On Ramesh Deo Demise Nrps

रमेश देव यांच निधन म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी – रजा मुराद

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अंबानी रुग्णालयात त्यांना आज सकाळी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:06 PM
रमेश देव यांच निधन म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी – रजा मुराद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मराठी सिनेमा, रंगभूमी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मुंबईत निधन झाले आहे. 93 व्या वर्षां त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल जेष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी प्रतिक्रीया दिली. रमेश देव यांच निधन म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अंबानी रुग्णालयात त्यांना आज सकाळी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्याबद्दल बोलताना जेष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते नेहमीखूप अॅक्टिव्ह राहायचे. नेहमी फिट राहत होते. असे ते म्हणाले. “त्यांच असं निघूण जाण ही खूप दुख:द घटना आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहे”  ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी असल्याचं ते म्हणाले.

[read_also content=”येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन https://www.navarashtra.com/movies/ramesh-deo-passes-away-231594.html”]

रमेश देव यांचे सुहासिनी, अपराध, आनंद असे माईलस्टोन सिनेमे ठरले. तसंच लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा  ही त्यांची नाटक खूपच चालली. तसंच भावबंधन, उसना नवरा, गहिरे रंग, गुलाम, पैसे झाडाला लागतात, अकुलिना, लालबंगली या नाटकातील भूमिकांचंदेखिल कौतुक झालं. राजा गोसावी, आत्माराम भेंडे यांच्यासह त्यांची अनेक नाटकातून जोडी जुळली. रमेश देव यांचा खलनायक जितका रसिकांना भावला तितकाच भावला आनंद सिनेमामधला डॉ. प्रकाश कुलकर्णी.

Koo App

प्रख्यात अभिनेते,निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. सुमारे २८५ चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय रंगभूमीवरही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

View attached media content

– Supriya Sule (@supriya_sule) 2 Feb 2022


पडछाया, सुहासिनी, अपराध, सोनियाची पावले, देवघर, माझे घर माझी माणसं, ते माझे घर, अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकाराली होती. तसेच रमेश देव यांनी मराठी सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींसह काम केल. मात्र त्यांची अप्रतिम जोडी जमली ती सीमा देव यांच्याशी. या दोघांनी अनेक सिनेमांमधून काम केलं.

“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्यजीवन महाराष्ट्रासाठी आदर्शवत होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,”
                                                                         -उपमुख्यमंत्री अजित पवार

 

“जेष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटक्षेत्राने एक अत्यंत देखणा, शैलीदार अभिनेता गमावला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. “भारतीय चित्रपट सृष्टीत विशेषतः मराठी चित्रपट क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांपासून ते आजच्या जाहिराती आणि वेब माध्यमापर्यंत सर्व माध्यमांमध्ये रमेश देव यांनी अभिनेता म्हणून आपली छाप सोडली होती. हिंदी चित्रपटांतही त्यांनी विविध भूमिका साकारून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. निर्माता म्हणूनही त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले.त्यांनी रंगभूमीवर अभिनेता आणि निर्माता म्हणून विशेष योगदान दिले होते. त्यांच्या पत्नी जेष्ठ अभिनेत्री सीमा, यांच्यासोबत पडद्यावरील त्यांची जोडी रसिकांना विशेष भावली. भरभरून जीवन जगणारे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

                                                                                        -अमित विलासराव देशमुख 

 

जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आपले संपूर्ण आयुष्य फक्त अभिनयासाठी वाहीले. देव यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर काही दशके अधिराज्य गाजवले त्यामुळे त्यांच्या जाण्याने अभिनयातला देव हरपला आहे.आज चित्रपटसृष्टीतील एक देखणा तारा निखळला आहे. उत्साहाचा झरा असणाऱ्या नायकाला आज आपण मुकलो अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

                                                                                   – मंत्री छगन भुजबळ 

Web Title: Seniour actor raja murad reaction on ramesh deo demise nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 09:36 PM

Topics:  

  • ramesh deo

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘येताना समोसे आणा’…, पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण

‘येताना समोसे आणा’…, पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा

Navi Mumbai Crime : अरे चाललंय तरी काय! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला

Navi Mumbai Crime : अरे चाललंय तरी काय! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला

नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमितीत पडेल ‘इतकी’ भर 

नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमितीत पडेल ‘इतकी’ भर 

शक्तिशाली AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा लूकसह Samsung Galaxy S25 FE लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

शक्तिशाली AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा लूकसह Samsung Galaxy S25 FE लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

क्रिकेटप्रेमींच्या खिशाला बसणार फटका, IPL चे तिकीट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

क्रिकेटप्रेमींच्या खिशाला बसणार फटका, IPL चे तिकीट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

Ganesh Chaturthi 2025 :  ब्रिजस्टोन इंडिया गणेश चतुर्थी व्हिडिओत सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन पाटकर यांच्या कलेची दखल

Ganesh Chaturthi 2025 : ब्रिजस्टोन इंडिया गणेश चतुर्थी व्हिडिओत सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन पाटकर यांच्या कलेची दखल

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Kalyan : KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध

Kalyan : KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध

Kalyan : कल्याणमध्ये मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण

Kalyan : कल्याणमध्ये मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण

Ahilyanagar : नगरमध्ये अवतरले उज्जैनचे महाकाल !

Ahilyanagar : नगरमध्ये अवतरले उज्जैनचे महाकाल !

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.