• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ramesh Deo Biography Nrsm

रमेश देव यांची फिल्मी कारकिर्द

अनेक व्यक्तिरेखा मात्र या व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत एकच

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:06 PM
रमेश देव यांची फिल्मी कारकिर्द
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मरठीतला हँडसम हिरो आणि हिंदीतला व्हिलन असं रुप धारण करुन रंगकलेची आयुष्यभर पूजा करणारा एक उत्कृष्ट नट म्हणजे रमेश देव. कोल्हापूरातल्या तांबड्या मातीतला देखणा कलावंत….दिसायला गोरापान, उंच शरीरयष्ट, आणि अंदाज अगदी हटके..

रमेश देव यांचं बालपण कोल्हापूरातलं….वडिल वकिल तर आजोबा इंजिनिअर..त्यामुळे त्यांच्या घरातलं कोणीही चित्रपटसृष्टीमध्ये नव्हतं…मात्र योगायागाने रमेश देव शाळेच्या नाटकात काम करायला लागले….शाळेत असताना ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटकात त्यांनी पहिल्यांदा काम केलं….या नाटकात त्यांनी शिवाजीची भूमिका साकारली….आणि तिसरं बक्षिसही पटकावलं….आणि अशाप्रकारे रमेश देव यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला….मात्र सिनेमा किंवा नाटकात करिअर करावं असा विचारही त्यांच्या डोक्यात नव्हता…
पण नियतीच्या मनात काहीतरी औरच होतं.  भालजी पेंढारकरांच्या ‘शिवाजी’ या सिनेमात त्यांनी पडेल ती कामं केली….आणि मराठी सिनेमातून अनेक छोटी-छोटी काम करत असतानाच ‘येरे माझ्या मागल्या’ या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली….या सिनेमासाठी त्यांना 250 रु मानधन मिळालं……रमेश देव यांची अशी सिनेसृष्टीतील वाटचाल सुरू होती मात्र, अभिनयाऐवजी त्यांना सैन्यात किंवा पोलिसात भरती व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नदेखिल सुरू केलं…मात्र, त्यांच्या नशीबाची दारं उघडली ती सिनेसृष्टीची….आणि या मायानगरीत त्यांना घेऊन आली…अचानक त्यांची एकदा गाठ राजाभाऊ परांजपे यांच्याशी पडली…..आणि त्यांनी रमेश देव यांना ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमात खलनायकाची भूमिका दिली…या सिनेमासाठी त्यांचं मानधन होतं 350 रु…..हा सिनेमा हिट झाला… या सिनेमातील रमेश देव यांच्या कामाचं खूपच कौतुक झालं….’मराठी सिनेसृष्टीला नवा प्राण मिळाला’ अशी स्तुतीसुमनं त्यांच्यावर झाली…..या सिनेमाने त्यांना भरपूर नाव मिळवून दिलं…. या यशानंतर त्यांना मराठी सिनेमांच्या अनेक ऑफर येऊ लागल्या…पडछाया, सुहासिनी, अपराध, सोनियाची पावले, देवघर, माझे घर माझी माणसं, ते माझे घर, अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली………
सुहासिनी आणि अपराध हे मराठीतले त्याचे दोन माईलस्टोन फिल्मस ठरले…
आणि अपराधमधलं त्याचंं हे गाणं तर मराठी रसिक कधीच विसरू शकणार नाहीत…
मराठी सिनेमांमधला हा खलनायक ‘साता जन्मांचा सोबती’ या सिनेमामुळे नायक झाला….हा सिनेमा हिट झाला आणि हा नायक प्रेक्षकांना कमालीचा भावला….मराठीतला हा खलनायक नायक झाला.
यानंतर रमेश देव यांनी मराठी सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींसह काम केलं…मात्र त्यांची अप्रतिम जोडी जमली ती सीमा देव यांच्याशी….ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनदेखिल….ट्रेनमध्ये पहिल्यांदा रमेश देव यांनी सीमा देव यांना पाहिलं आणि त्यांची ही भेट सातजन्माची भेट ठरली…पहिल्याच भेटीत रमेश देव सीमा देव यांच्यावर फिदा झाले. ऑन स्क्रीन तर ही जोडी रसिकांनी खूपच पसंत केली….ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांचा काळ या दोघांमुळे झळाळून गेला….
मराठी सिनेमांसह रंगभूमीवरदेखिल रमेश देव यांनी आपली छाप पाडली….राजा गोसावी, आत्माराम भेंडे यांच्यासह त्यांची अनेक नाटकातून जोडी जुळली…….
लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा  ही त्यांची नाटक खूपच चालली….
तसंच भावबंधन, उसना नवरा, गहिरे रंग, गुलाम, पैसे झाडाला लागतात, अकुलिना, लालबंगली या नाटकातील भूमिकांचंदेखिल कौतुक झालं…..
यानंतर अपार कष्टानंतर त्यांना राजश्री प्रोडक्शनचा ‘आरती’ सिनेमा मिळाला….तसंच हिंदीमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी 3 सिनेमांमध्ये नायकाचं काम केलं…हे तीनही फिल्मस फ्लॉप ठरले मात्र त्यानंतर आलेला ‘जैसे को तैसा मिला’ सिनेमा चालला…या सिनेमात त्यांनी खलनायकाचं काम केलं होतं…रमेश देव यांचं या सिनेमातील काम रसिकांनी खूपच पसंत केलं….आणि मग त्यांनी हिंदीत मागे वळून पाहिलंच नाही…हिंदीमध्ये त्यांनी अनेक सिनेमातून खलनायक साकारला आणि हा खलनायक त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये साकारला…..
आणि रमेश देव यांचा खलनायक जितका रसिकांना भावला तितकाच भावला आनंद सिनेमामधला डॉ. प्रकाश कुलकर्णी………
अशा अनेक व्यक्तिरेखा मात्र या व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत एकच..
आणि कलेच्या या प्रेमापोटीच कालांतराने रमेश देव निर्मिती आणि दिग्दर्शनाच्याक्षेत्रात आले…
तसंच जाहिरातीच्याक्षेत्रात नशीब आजमावून RDP या कंपनीची स्थापना केली…अभिनय देव सध्या या नंबरवन जाहिरीती कंपनीचा कारभार सांभाळतोय…तर अजिंक्य देव आपल्या वडिलाप्रमाणेच अभिनयावर लक्ष केंद्रीत करतोय….
आपल्या सुखी संसाराची ही पन्नासवर्षे सेलिब्रेट करण्यासाठी रमेश देव यांनी सीमा देव यांच्याशी  पुन्हा लग्न केलं तेही सूना-मूल-नातवंडं आणि आप्तेष्टांच्या साक्षीनं….
रमेश देव हे नेहमी सामाजिक कार्यातदेखिल सक्रिय दिसले….आणि बिग स्क्रीनसह स्मॉल स्क्रीनवरही त्यांनी कलेची सेवा केली . रमेश देव यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला.
२०१३ मधील ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीआयएफएफ) रमेश देव यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला आहे. तसंच रमेश देव यांना दोन मुलं . अभिनय आणि अजिंक्य देव. अभिनय हा चित्रपट दिग्दर्शक आहे, त्याने २०११ मध्ये ‘दिल्ली बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजिंक्य हा एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे.

 

रमेश देव यांचे गाजलेले सिनेमे
घायल पुन्हा एकदा
चंदी (२०१३)
जॉली एलएलबी
पिपानी (२०१२)
राज का रण (२०११)
जेता (२०१०)
गोश्ता लग्नांतर्ची (२०१०)
टिन्हिसंजा
हौन जा दे!
विघ्नहर्ता … श्री सिद्धिविनायक
गलगले निघाले
वासुदेव बळवंत फडके (२००७)
उल्फत की नायी मंजिलेन (१९९४)
निश्चय (१९९२)
घायाळ
प्रतिबंध
अजाद देश के गुलाम
तुफान (१९८९)
घराना (१९८९)
जनम जनम
खेल मोहब्बत का
मिस्टर इंडिया (१९८७)
औलाद (१९८७)
इनाम दस हजारा (१९८७)
डाकू हसीना (१९८७)
मेरा हक (१९८६)
अल्लाह राखा (१९८६)
काला धंदा गोरे लॉग (१९८६)
प्यार किया है प्यार करेंगे (१९८६)
इल्जाम (१९८६)
हम नौजवान (१९८६)
कर्मयुध (१९८५)
कभी अजनाबी द (१९८५)
एक चिट्टी प्यार भरा (१९८५)
ग्रहस्थी (१९८५)
हम दो हमारा दो (१९८५)
लैला (१९८४)
हेच माझा माहेर (१९८४)
ताकदीर (१९८३)
बायको असवी आशी (१९८३)
खुड-दार (१९८२)
श्रीमान श्रीमती (१९८२)
हातकडी (१९८२)
चंबल के डाकू (१९८२)
दुल्हा बिका है (१९८२)
दहशत (१९८१)
फाटकडी (१९८०)
नाईट बाय बॉम्बे
दादा
महाविद्यालयीन मुलगी (१९७८)
अंजना में (१९७८)
हीरालाल पन्नालाल (१९७८)
हीरा और पत्थर (१९७७)
जादू टोना (१९७७)
जय गणेश (१९७७)
ये है जिंदगी (१९७७)
रईस (१९७६)
नाग चंपा (१९७६)
आखरी दाव (१९७५)
एक महल हो सप्नो का (१९७५)
ओवल्टे भाऊराया (१९७५)
राणी और लालपरी (१९७५)
प्रेम नगर (१९७४)
कोरा कागझ (१९७४)
३६ घंटे (१९७४)
गीता मेरा नाम (१९७४)
हम जंगल हैं (१९७३)
धर्म (१९७३)
काश्मकाश (१९७३)
बन्सी बिरजू (१९७२)
बीस साल पेहले (१९७२)
जोरू का गुलाम (१९७२)
कोशिष (१९७२)
लालकर (१९७२)
मानवता (१९७२)
रामपूर का लक्ष्मण (१९७२ )
ज़मीन आसमान (१९७२)
संजोग (१९७२)
बॅन फूल (१९७१)
हुल्चुल (१९७१)
लाखों में एक (१९७१)
मेरे आपने (१९७१)
आनंद (१९७१)
मस्ताना
जीवन मृत्यु
खिलोना
दर्पण
मुजरीम
शार्ट
सरस्वती चांदारा (१९६८)
शिकार (१९६८)
चिमुकला पाहुना (१९६७)
मेहरबान (१९६७)
स्वप्ना टेक लोचानी (१९६७)
दस लाख (१९६६)
गुरुकिल्ली (१९६६)
प्रेम आणि खून (१९६६)
शेवाचा मालुसुरा (१९६५)
पडछाया (१९६४)
माझा होशील का? (१९६३)
आरती (१९६२)
भाग्य लक्ष्मी (१९६२)
वरदक्षिना (१९६२)
माझी आई (१९६१)
सुवासिनी (१९६१)
जगाचार्य पाठीवार (१९६०)
पैशाचा पाउस (१९६०)
उमाज पडेल तार (१९६०)
साता जन्माची सोबती (१९५९)
देवघर (१९५६)
गथ पडली थाका थाका (१९५६)
अंधळा मगटो एक डोला (१९५५).

Web Title: Ramesh deo biography nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 09:36 PM

Topics:  

  • ajinkya deo
  • ramesh deo
  • udhdhav thakrey

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! राज्यभरातील सर्व शाळा 24 नोव्हेंबरला राहणार बंद; TET सक्तीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

मोठी बातमी ! राज्यभरातील सर्व शाळा 24 नोव्हेंबरला राहणार बंद; TET सक्तीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

Nov 12, 2025 | 07:46 AM
Air Pollution : दिल्लीतील प्रदूषणामुळे मोठं संकट; लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका, केंद्राने जारी केल्या सूचना…

Air Pollution : दिल्लीतील प्रदूषणामुळे मोठं संकट; लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका, केंद्राने जारी केल्या सूचना…

Nov 12, 2025 | 07:05 AM
15 नोव्हेंबर 2025 लक्षात ठेवा! एक-दोन नव्हे तर ‘या’ 5 कार होणार लाँच

15 नोव्हेंबर 2025 लक्षात ठेवा! एक-दोन नव्हे तर ‘या’ 5 कार होणार लाँच

Nov 12, 2025 | 06:15 AM
छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Nov 12, 2025 | 05:30 AM
बाल्यावस्थेतील कर्करोगग्रस्त मुलांसाठी ‘सुनेहरे स्वर बन जायेंगे गोल्ड’ संगीत मैफिल

बाल्यावस्थेतील कर्करोगग्रस्त मुलांसाठी ‘सुनेहरे स्वर बन जायेंगे गोल्ड’ संगीत मैफिल

Nov 12, 2025 | 04:20 AM
Maharashtra Politics: महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’ आणि आघाडीमध्ये ‘बिघाडी’; ‘या’ तालुक्यात अद्याप निर्णय नाहीच

Maharashtra Politics: महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’ आणि आघाडीमध्ये ‘बिघाडी’; ‘या’ तालुक्यात अद्याप निर्णय नाहीच

Nov 12, 2025 | 02:35 AM
क्रिकेट विश्वात चमकतोय नवा भारतीय हिरा; अष्टपैलू वॉशिंग्टन आहेच सुंदर खरा

क्रिकेट विश्वात चमकतोय नवा भारतीय हिरा; अष्टपैलू वॉशिंग्टन आहेच सुंदर खरा

Nov 12, 2025 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM
पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Nov 11, 2025 | 11:28 PM
Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Nov 11, 2025 | 08:19 PM
Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Nov 11, 2025 | 08:12 PM
Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Nov 11, 2025 | 02:39 PM
Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Nov 11, 2025 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.