राम मंदिर उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिकेवर मोठी चूक; महत्त्वाचा ‘हा’ शब्दच चुकला

अयोध्या नगरीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणासाठी खास पत्रिका देखील छापण्यात आल्या आहेत. मात्र या पत्रिकेमध्ये महत्त्वाची चूक आढळून आली आहे.

    अयोध्या : अयोध्या (Ayodhya) नगरीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामांची (Prabhu Shree Ram) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या अभूतपूर्ण सोहळ्यासाठी सर्वजण उत्साही व आनंदी असताना एक चूक (Invitation Letter Mistake) समोर आली आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणासाठी खास पत्रिका देखील छापण्यात आल्या आहेत. मात्र या पत्रिकेमध्ये महत्त्वाची चूक आढळून आली आहे.

    अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी चालू आहे. आमंत्रणावरुन राजकारण रंगले असताना या आमंत्रण पत्रिकेवर चूक झाली आहे. सोशल मीडियावर या पत्रिकेचे फोटो तुफान व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. .या आमंत्रण पत्रिका इंग्रजी भाषेमध्ये देखील छापण्यात आल्या आहेत. इंग्रजी भाषेतील पत्रिकेमध्ये या महत्त्वाच्याच शब्दांची चूक करण्यात आली आहे.

    राम मंदिर उद्घाटनाच्या इंग्रजी भाषेतील पत्रिकेवर पहिल्य़ा पानावर मोठ्या अक्षरामध्ये ‘Invitation’ शब्द लिहिण्यात आला आहे. मात्र त्याचे स्पेलिंगच चुकले आहे. पत्रिकेवर ‘Invitaion’ असे चुकीचे स्पेलिंग लिहिण्यात आले आहे. यामुळे अनेकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे.

    एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “तुमच्याकडे फक्त एक काम होते, वरवर पाहता ही “सभ्यतेच्या नवीन युगाची सुरुवात” आहे, परंतु साध्या गोष्टी देखील तुम्ही नीट करु शकत नाहीत.”