नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले आहे. यासोबतच एक्झिट पोलचे निकालही येत आहेत. पाचही राज्यांतील (उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर) भविष्यातील सरकारचे निकाल १० मार्च रोजी येणार आहेत, परंतु आज ७ मार्च रोजी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत.
आजतक, रिपब्लिक भारत, एबीपी न्यूज, टाईम्स नाऊ या सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित केलेले एक्झिट पोल आम्ही तुमच्यासाठी एकाच व्यासपीठावर आणले आहेत. या एक्झिट पोलवरून हे स्पष्ट झाले नाही की, सर्वाधिक कल असलेला पक्ष निवडणूक जिंकतोय, पण या राज्यात या पक्षाच्या विजयाची शक्यता किती आहे, याचा अंदाज एक्झिट पोलवरून नक्कीच बांधता येईल. सध्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची सरकारे आहेत, तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.