नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जागा जरी घटणार असल्या तरी उत्तर प्रदेशची बाजी भाजपच मारणार असल्याचं प्रमुख एक्झिट पोल्समधून स्पष्ट झालं आहे. युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
तीन कृषी कायद्यांविरोधात एका वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऊस पट्ट्यात भाजप 51-59 जागा जिंकू शकतो. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनातून मुस्लिम-जाट युती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सपा आघाडीला 49-57 जागा मिळू शकतात. बसपाला 3-7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला फक्त 0-2 जागा मिळू शकतात.
रिपब्लिक टीव्ही
भाजप- 240
सपा- 140
बसपा- 17
इतर- 02
ईटीजी रिसर्च
भाजप- 237
सपा- 157
बसपा- 07
इतर- 04
न्यूज 18
भाजप- 240
सपा- 140
बसपा- 17
इतर- 02
हिंदुस्थान टाईम्स
भाजप-240
सपा- 140
बसपा- 17
इतर- 04
एकूण एक्झिट पोलची सरासरी
भाजप- 232
सपा- 147
बसपा- 16
इतर- 02