पणजी : गोव्यात पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये (Goa Assembly Election 2022) विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी मिशन २०२२ (Mission 2022) साठी तयारी सुरु केली आहे. भाजपा (BJP), काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), आप (AAP), टीएमसी (TMC) हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अशातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant Statement About Goa Election) यांनी गोवा विधानसभा निवडणुकीविषयी मत व्यक्त केलं आहे.
प्रमोद सावंत म्हणाले, “लोक आमच्या बरोबर आहेत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी मला विश्वास आहे. परत एकदा भाजपाचं सरकार गोव्यामध्ये स्थापन होईल. गोव्यात मुख्य विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष आहे. बाकी कोणी विरोधक असणार नाही. प्रथम राज्य म्हणून मी काम करत आहे. राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी घरी पाठवले आहे.”
[read_also content=”‘काँग्रेसकडे इतका आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊत यांचा काँग्रेस नेत्यांना खोचक सवाल https://www.navarashtra.com/goa/where-does-congress-get-so-much-confidence-sanjay-rauts-sharp-question-to-congress-leaders-nrkk-226119.html”]
आपविषयी प्रमोद सावंत म्हणाले की, आपने आधी स्वतःच्या राज्यात किती जणांना नोकऱ्या दिल्या ते बघावं त्यानंतर गोव्यात पोस्टरबाजी करावी.
दरम्यान माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utapal Parrikar) यांनी भाजपाशी बंडखोरी केली आहे. पणजीतून (Panji) भाजपाने तिकिट न मिळाल्याने नाराज झालेल्या उत्पल यांनी भाजपाला रामराम केला आहे. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
उत्पल यांना गोव्यातील भविष्य असे भाजपाकडून पाहिले जात होते. यावेळी जरी ते निवडणूक हरले असते तरी त्यांना पक्षात चांगली जबाबदारी देण्यात येणार होती, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. चार वर्षांनंतर २०२७ साली उत्पल यांचे मोठे लॉन्चिंग करण्याची भाजपाची योजना होती. मात्र आता उत्पल यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गोव्यातील निवडणूक भाजपासाठी अधिक अडचणीची झाली असेच म्हणावे लागेल.