Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानध्ये तालिबानने २० वर्षे लढा देत अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाजले होते. आता इराणनही त्याच रणनीचा वापर अमेरिकेविरोधात करत आङहे. याला मोजॅक डिफेन्स (Mosaic Defence) रणनीत म्हटले जात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या कारवाईला उत्तर देण्यासाठी इराणने नवीन संरक्षण धोरण आखले आहे. ज्यामुळे चार दिवसांतच इस्रायल-अमेरिका सैन्य हाफसू लागले आहे. अमेरिका इस्रायलची परिस्थिती अफगाणिस्तान आणि व्हिएतनामसारख्या होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिका-इस्रायली हल्ल्यानंतर इराणने आपल्या संरक्षण धोरणात मोठा बदल केले आहे. इराणने डिसेंट्रलायझेशनचा अवलंब केला असून या अंतर्गत इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ३१ वेगवेगळ्या युनिट्समध्ये विभागले आहे. एक युनिट इराणची राजधानी तेहरानमध्ये तैनात करण्यात आले असून इतर ३० युनिट्स इराणच्या वेगवेळ्या प्रांतात आहेत. या प्रांतातील कमांडर्सना सर्व अधिकार देण्यात आले अलून हल्ल्यासाठी किंवा लष्करी कारवाईसाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. हे युनिट्स त्यांच्या मर्जीने ड्रोन, क्षेपणास्त्रांचा वापर करु शकतात.
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या केंद्रीय कमांड सिस्टम, कम्युनिकेशन लाईन्स आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकामागून एक हल्ले केले आहेत. ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’च्या माध्यमातून इराणची संपर्क यंत्रणा जाम करण्याचा प्रयत्न इस्रायल-अमेरिकेने केला आहे. ज्यामुळे इराणच्या प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र्य सैन्य तैनात करण्यात आले आहे.
इराण भू-राजकीय दृष्ट्या डोंगराळ आणि वाळवंटी भागात आहे. याला इराणी लष्कर डिफेन्स इन डेप्थ म्हणतात. या डोंगराळ भागांमध्ये जमिनीखाली इराणने आपली लष्करी तळे उभी केली आहेत. तालिबाननेही अमेरिकेशी युद्धादरम्यान ही रणनीती अवलंबवली होती. या रणनीती अंर्तगत शत्रूला थकवणे, त्यांच्यावर वारंवार आणि अचानक हल्ले करणे, युद्ध लांबवून त्यांची आर्थिक व लष्करी शक्ती कमकुवत करणे, हे इराणचे मुख्य उद्दिष्ट आहे.
गेल्या चार दिवसांपासून इराण याच रणनीतीच्या मदतीने मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अमेरिकन दूतावासा आणि लष्करी तळांवर हल्ले करत आहे. ज्यामुळे अमेरिकेला सळो की पळो झाले आहे.
ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग






