नवी दिल्ली : एक्झिट पोल समोर आल्यानंतर (Assembly Elections Exit Polls) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे. त्याचवेळी राज्याची कमान पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यात आघाडी मिळताना दिसत आहे.
[read_also content=”सरळसोप्या मराठी भाषेत Share Market शिकवणाऱ्या सुपरस्मार्ट आजीबाई, यांच्या Knowledge पुढे भले भले Expert फिके पडतील https://www.navarashtra.com/latest-news/dinvishesh/womens-day/share-market-expert-youtuber-bhagyashree-phatak-exclusive-interview-nrsr-251182.html”]
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सावंत म्हणाले, भाजप २० हून अधिक जागा जिंकत आहे. बहुतांश एक्झिट पोल भाजपचा विजय दर्शवतात. आम्ही अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू. त्यांच्या मागण्यांबाबत केंद्रीय नेतृत्व पक्षाच्या संपर्कात आहे. गरज पडल्यास आम्ही MGP चे समर्थन घेऊ.
ते पुढे म्हणाले, मी आज पीएम मोदींना भेटलो, निवडणुकांबाबत चर्चा झाली. आम्ही जास्तीत जास्त जागा मिळवून सरकार बनवत आहोत…मला वाटतं की मला पुन्हा एकदा पक्षाची (मुख्यमंत्री म्हणून) सेवा करण्याची संधी मिळेल. भाजप जे बोलतं ते करून दाखवतं. त्यामुळं भाजपने हे सांगितलं आहे आणि ते नक्कीच होईल. भाजप अपक्ष आमदारांची मदत घेऊ शकतो, असं सावंत यांनी यापूर्वीही म्हटलं आहे.
दरम्यान एक्झिट पोलमध्ये भाजपला १३ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला १४ ते १९ जागा मिळतील अशी शक्यता आहे. यामुळे दोन्ही पक्षात कांटे की टक्कर असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.