नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलची पाळी आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरसह पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर 10 मार्चला निकाल लागण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
प्रत्यक्ष निकालापूर्वी आम्ही तुम्हाला चाणक्य टुडेजच्या पाचही राज्यांचे एक्झिट पोलचे निकाल सांगत आहोत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चाणक्य टुडेचे एक्झिट पोल समोर येत आहेत.
चाणक्य टुडे पंजाब एक्झिट पोल निकाल:
चाणक्य टुडेच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला प्रचंड बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीच्या खात्यात 100 जागा येणार असल्याचे सांगण्यात आले. तर काँग्रेसला 10 जागा मिळणार आहेत. शिरोमणी अकाली दलाला 6 तर भाजपला फक्त एक जागा मिळणार आहे. हे आकडे फारच धक्कादायक आहेत.
चाणक्य टुडे उत्तराखंड एक्झिट पोल निकाल:
चाणक्य टुडेच्या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत आहे. भाजपला 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांबद्दल बोलायचे तर इतरांना 3 जागा मिळत आहेत.