जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले; ९४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

जायकवाडी धरणाचे (Jayakwadi dam ) आज शुक्रवारी (Friday) पहाटे ४ च्या सुमारास ९ आपात्कालीन दरवाजांसह सर्व २७ दरवाजे (27 gates open) उघडण्यात आले आहेत. तसेच या धरणातून ९४ हजार ३२० क्युसेक्स ( Discharge of 94,000 cusecs of water) इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.

 पैठण : जायकवाडी धरणाचे (Jayakwadi dam ) आज शुक्रवारी (Friday) पहाटे ४ च्या सुमारास ९ आपात्कालीन दरवाजांसह सर्व २७ दरवाजे (27 gates open) उघडण्यात आले आहेत. तसेच या धरणातून ९४ हजार ३२० क्युसेक्स ( Discharge of 94,000 cusecs of water) इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. २७ पैकी ९ दरवाजे हे आपत्कालीन समजले जातात. आणीबाणी प्रसंगी उघडण्यात येणारे हे ९ दरवाजे शुक्रवारी प्रत्येकी २ फुट तर उर्वरीत १८ दरवाजे ४ फुट वर उचलण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही कालव्यांतूनही जलविसर्ग केला जात आहे.

जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने गोदावरी नदीला तुफान पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी (Godavari River)  नदीतील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. तसेच नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गोदावरीच्या तीरावर असलेल्या तालुक्यातील १४ गावांसह शहरवासीयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासनाने हा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणात सध्या एकूण पाणीसाठा २८९७.१०० दलघमी असून त्याची एकूण टक्केवारी ९९.४४  टक्के इतकी आहे. तर धरणातील जिवंत पाणीसाठा २१५८.९९४ दलघमी इतका आहे.