मासे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्यांनतर ओले मासे बाजारात येणे बंद होऊन जाते, अशावेळी सुके मासे अतिशय आवडीने खाल्ले जातात. सुरमई, बोंबील, कोलंबी इत्यादी मासे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोकळ्या मैदानात मीठ लावून सुकवले जातात आणि त्यानंतर सुकलेल्या माशांची विक्री केली जाते. पण कोणत्याही ऋतूंमध्ये सुके मासे खाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुक्या माशांमध्ये सोडियम, जाड मीठ आणि बुरशीजन्य विषारी घटक असतात. हे घटक शरीरासाठी विषारी ठरण्याची खूप जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सुके मासे खाताना कोणती काळजी घ्यावी. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात सुके मासे आवडीने खाता! मासे खाण्याआधी 'या' गोष्टींची काळजी घेणे आवश्यक, अन्यथा आरोग्यावर होतील परिणाम

निरोगी व्यक्ती दैनंदिन आहारात सुक्या माशांचे सेवन करू शकते. माशांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

हृदयरोग आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी दैनंदिन आहारात कमीत कमी सुक्या माशांचे सेवन करावे. कारण सुक्या माशांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीरासाठी घातक ठरते.

सुक्या माशांमध्ये जड धातू असतात. त्यामुळे गर्भवती महिला, गर्भातील बाळ आणि लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊन शरीराला धोका निर्माण होतो.

सुके मासे बनवताना ते काहीवेळ गरम किंवा कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर मासे स्वच्छ पाण्याने ३ ते ४ धुवून नंतरच शिजवावे.

जड धातू आणि अतिरिक्त सोडियम मूत्रपिंड आणि यकृतावर जास्तीचा भर टाकतात. यामुळे किडनीचे आजार किंवा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.






