फोटो सौजन्य- iStock
बाईक अथवा दुचाकीमधील महत्वाच्या घटकापैकी एक कार्बोरेटर आहे. कार्बोरेटर हा बाईक इंजिनमधील अत्यंत महत्वाचा भाग आहे. कार्बोरेटरद्वारे हवा इंधनात मिसळते आणि इंजिनच्या आत जाते. वाहनाचा कार्बोरेटर जर नीट काम करत नसेल तर बाइक चालवताना खूप समस्या येतात ज्या तुम्हीही कधी ना कधी अनुभवल्या असू शकतात. याचा थेट मायलेजवरही परिणाम होतो. मात्र आजच्या नवीन बाइक्स या फ्युएल इंजेक्टेड इंजिनसह बाजारात येत आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यामद्ये कार्बोरेटर सिस्टम नसते, मात्र तरीही आज कार्बोरेटर असलेल्या लाखो टू व्हीलर्स रस्त्यावर धावत आहेत .
अनेकदा बाईक सर्व्हिसिंगसाठी नेण्यात येते त्यावेळी मेकॅनिककडून कार्बोरेटर उघडून स्वच्छ करुन उघडून स्वच्छ करण्याचा सल्ला देतो. परंतु खरा प्रश्न हा आहे की जर बाईक नीट चालत असेल तर कार्बोरेटर साफ करण्याची आवश्यकता आहे का ? कारण कार्बोरेटर विनाकारण उघडण्याचे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे उगाच कार्बोरेटर उघडल्यास त्यामुळे तुमच्या बाईकचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काही समस्या उद्भवतात.
कार्बोरेटर विनाकारण उघडल्यास या समस्या उद्भवतात
कोणत्याही बाईकचा अथवा दुचाकीचा कार्बोरेटर हा एक अतिशय गुंतागुंतीचा घटक आहे. तो एकदा उघडला की तो पुन्हा व्यवस्थित सेट करणे प्रत्येक मॅकेनिकला जमते अश्यातला भाग नाही. कार्बोरेटरमध्ये एक सीलिंग असते जे कंपनी त्याच्या उत्पादनाच्यावेळी बनवते. मात्र कार्बोरेटर उघडल्यानंतर हे सीलिंग कमकुवत होते, काही मॅकेनिक हे सीलिंग योग्यरित्या सेट करू शकत नाहीत. त्यामुळे बाईकच्या इंजिनमध्ये इंधन तसेच हवा गळतीसारख्या समस्या आढळू लागतात. आणि या समस्यांमुळे चांगली असणारी बाईकमध्ये अचानक अनेक समस्या निर्माण होतात. बाईकचे मायलेजही कमी होते.
जर मॅकेनिकने कार्बोरेटरचे इंधन मिश्रण व्यवस्थित सेट केले नाही तर बाईक कुठेही बंद पडू शकते. ज्यामुळे प्रवास करताना तुम्हाला अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो.
जेव्हा या समस्या दिसतात त्यावेळी कार्बोरेट उघडणे महत्वाचे
ज्यावेळी कार्बोरेटरमध्ये कचरा जमा झाला असेल आणि इंजिन सुरु होत नसेल त्यावेळी कार्बोरेटर उघडावा. तसेच जर इंधन गळती होत असेल त्यावेळीही कार्बोरेटर उघडून तो ठीक करावा लागतो. कार्बोरेटरच्या आतील भागात काही खराबी वाटत असेल तर त्यावेळी कार्बोरेटर दुरुस्ती केली पाहिजे.