Apple iPhone 16 Pro Max च्या किंमतीत येईल 'या' 5 दमदार बाईक्स
अॅपल ही कंपनी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची उत्पादन करणारी कंपनी आहे. यातही त्यांचे मोबाईल्स मार्केटमध्ये चांगलेच गाजत असतात. कंपनीच्या आयफोन्सची क्रेज सध्या भारतभर दिसत आहे. आजही एखाद्या व्यक्तीकडे आयफोन असणे ही प्रतिष्ठेची बाब समजली जाते. काही जर तर फक्त आपला स्टेट्स मेंटेन ठेवण्यासाठी आयफोन विकत घेत असतात. भारतीय ग्राहकांची वाढती मागणी पाहता आयफोन सुद्धा भारत नवनवीन आयफोनचे व्हर्जन लाँच करत असते.
नुकताच आयफोन 16 लाँच झाला आहे. या फोनची किमंत तब्बल 1.45 लाख रुपये आहे, जी नक्कीच सर्वसामान्यांना घाम फोडणारी आहे. या किंमतीत तर एक चांगली परफॉर्मन्स असणारी बाईक येऊ शकेल. जर तुम्ही सुद्धा आयफोन 16 घेण्याऐवजी बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊया, Apple iPhone 16 Pro Max च्या किंमतीत कोणती बाईक येऊ शकते.
Hero Extreme 125R मध्ये लो-स्लंग एलईडी हेडलॅम्प, मस्क्यूलर फ्युएल टँक, शार्प एलईडी इंडिकेटर, स्प्लिट सीट्स आणि अपस्वेप्ट टेल आहेत. या बाईकमध्ये 125cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 11.4bhp पॉवर आणि 10.5Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन पाच-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. यात स्टँडर्ड म्हणून फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम किंवा डिस्क ब्रेक पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत 95,000 ते 99,500 रुपये दरम्यान आहे.
ही बाईक सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनसह येते, जी 11.2bhp पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. ही बाईक भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. ही त्याच्या स्टाइल,कार्यप्रदर्शन आणि इंधन कार्यक्षमतेमुळे ओळखली जाते. ही बाईक चार व्हेरियंटमध्ये येते, ज्यांची एक्स-शोरूम किंमत रु. 84,869 ते रु. 1.04 लाख दरम्यान आहे.
ही बाईक 125cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनसह येते, जी 9.37 bhp पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते. ही बजाज बाईक 2-लीटर पेट्रोल टाकी आणि 2 किलो CNG सिलेंडरसह येते. हे एकावेळी 330 किमी पर्यंतची रेंज देते. Freedom 125 CNG तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही एक्स-शोरूम किंमत 95,000 ते 1.10 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
ही बाईक 200cc सेगमेंटमध्ये त्याच्या अप्रतिम डिझाईनसह वेगळे आहे. यात 184.4cc इंजिन आहे जे 17 bhp पॉवर आणि 15.9 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1.39 लाख रुपये आहे.
बजाज पल्सर N160 मध्ये 164.82cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे 15.7 bhp आणि 14.65 Nm टॉर्क जनरेट करते. याची एक्स-शोरूम किंमत 1.23 लाख ते 1.40 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.