वाहन निर्मात्या कंपनीचे मालक कोणती कार चालवत असतील असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. त्यांच्याकडे आपल्या कंपनीच्या कारचे अनेक पर्याय असतात मात्र काही वाहन निर्मात्या कंपनीचे मालक सुरक्षिततेसाठी वेगळ्या ब्रॅंण्डच्या कारचा वापर करतात मात्र तो फार क्वचितच. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ते वापर असलेल्या कारबद्दल खुलासा केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी सांगितले की त्यांना त्यांची वैयक्तिक कार चालवताना त्यांना खूप अभिमान वाटतो. ते असे म्हणत आहेत कारण ते ज्या कारमधून प्रवास करतात ती कार त्यांच्या कंपनीची एसयुव्ही कार आहे. एक्सवर केलेल्या पोस्टवर आनंद महिंद्रा यांनी सांगितले की त्यांनी 30 वर्षांपासून महिंद्रा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीची कार वापरली नाही. एवढेच नाही तर कारबाबत सांगितलेल्या इतर गोष्टीही त्याने अफवा असल्याचे म्हटले. आनंद महिंद्राच्या म्हणण्यानुसार, ते स्वतः महिंद्रा कार चालवतात आणि त्यांच्या पत्नीलाही महिंद्रा कार चालवायला आवडते.
Hormazd, you have covered Mahindra since the time I joined the company. So you are in a unique position to call out this fabricated and fake story. Thank you.
And for the record:
I was taught how to drive by my mother, in her light sky-blue colour Premier car (earlier known as… https://t.co/BXFr3hfYVU
— anand mahindra (@anandmahindra) September 2, 2024
आनंद महिंद्रा सध्या चालवतात ‘ही’ कार
आपल्या कार बद्दल सांगताना आनंद महिंद्रा म्हणाले की, त्यांच्या कंपनीची कार चालवताना मला खूप अभिमान वाटतो. सध्या ते लाल रंगाच्या Scorpio-N SUV मध्ये प्रवास करतात ती कार त्यांची प्रचंड आवडती कार आहे.त्यांनी सांगितले की, कधीकधी मी माझ्या पत्नीची सिल्वर XUV7OO देखील चालवतो. इतकेच नाही तर आनंद महिंद्रा यांनी असेही स्पष्ट केले की, ते गेल्या 30 वर्षांपासून फक्त महिंद्रा कार वापरत आहेत आणि सध्या त्यांची वैयक्तिक कार लाल स्कॉर्पिओ आहे.
महिंद्राच्या कार या त्यांच्या टफनेससाठी ओळखल्या जातात. गेल्या महिन्यातच महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय कार थारचे थार 5 डोर मॉडेल लॉंच केले आहे. ही कार ऑफरायडिंगसाठी पहिली पंसत आहे. त्यासोबतच महिंद्राचा एसयुव्ही प्रकारामध्ये प्रचंड दबदबा आहे.