भारतात तापमानात सातत्याने होतोय बदल (फोटो- सोशल मिडिया)
देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट
5 राज्यांना हवामान विभागाचा अलर्ट
होळीच्या दिवशी तापमानात वाढ
India Weather Update: आज देशभरात सगळीकडे होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात रंगाची उधळण होत आहे. त्यातच देशातील हवामानात बदल होताना दिसून येत आहे. मार्च महिन्यात देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. मध्य भारतात तापमानात वाढ झाली आहे. डोंगराळ भागात पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत तापमानात 3 ते 4 डिग्रीने वाढण्याचा अंदाज आहे. आयएमडीने अनेक राज्यांना इशारा दिला आहे.
भारतात तापमानात वेगाने वाढ होत आहे. 4 मार्चपासून पश्चिम हिमालय प्रदेशात एक नवीन पश्चिम विक्षोभ येऊ शकतो. ज्यामुळे उंच प्रदेशात हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस आणि हिमवर्षाव होण्याचा अंदाज आहे, मैदानी भागात उष्ण व कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांमध्ये तापमानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतर 2 ते 3 डिग्रीने वाढण्याचा अंदाज आहे. पुढील आठवड्यात तापमानात 3 ते 4 डिग्रीने तापमानात वाढ होऊ शकते. राजधानी दिल्लीत गेल्या तीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात उष्ण महीना राहिला आहे. यामध्ये ९८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवा थोडी गार रहाण्याचा अंदाज आहे. दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. होळीच्या दरम्यान तापमानात वाढ होऊ शकते.
हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर भागात ४ मार्च रोजी पश्चिमी विक्षोभचा परिणाम दिसू शकतो. उंच पर्वतीय प्रदेशात पावसाची आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. मैदानी भागात तापमानात सामान्य राहण्याची शक्यता आहे. बिहार राज्यात तापमान वाढले आहे. पुढील एका आठवड्यात हवामान शुष्क राहण्याचा अंदाज आहे. सध्या बिहार राज्यात पावसाची शक्यता दिसून येत नाही.
India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
गेल्या काही दिवसांत तापमानाच्या पद्धतींमध्ये लक्षणीय बदल दिसून आला आहे. वायव्य भारतात दिवसाचे तापमान सातत्याने वाढत आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की पुढील सात दिवसांत कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढू शकते. गुजरात आणि महाराष्ट्रातही उष्णता तीव्र होऊ शकते. दरम्यान, पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत आहेत, ज्यामुळे डोंगराळ भागात पाऊस आणि हिमवर्षाव होत आहे.






