मुंबई : लक्झरी कार (Luxury car) बनवणारी जर्मनीची कंपनी (A German company) ऑडीने (Audi) आज भारतातील कार्सच्या (Indian Cars) विविध मॉडेल्सवरील (Models) किंमतीत २.४% वाढ (Price Hike) करीत असल्याची घोषणा केली.
कार्सच्या किंमतीतीतील वाढ इनपुट आणि पुरवठा साखळी खर्चात वाढ झाल्याने करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ २० सप्टेंबर २०२२ पासून लागू होईल(This hike will be effective from 20 September 2022).
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, “ऑडी इंडियामध्ये आम्ही शाश्वत व्यवसाय मॉडेल चालवण्यासाठी वचनबद्ध आहोत. इनपुट आणि पुरवठा साखळी खर्चात वाढ झाल्याने आम्हाला आमच्या कार्सच्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत २.४% वाढ करण्याची गरज निर्माण झाली.”
[read_also content=”ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्जचा शुभारंभ https://www.navarashtra.com/automobile/audi-india-has-started-bookings-for-the-new-audi-q3-see-the-details-here-in-marathi-314967.html”]
ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ५ स्पोर्टबॅक तसेच ऑडी आरएस क्यू८ चा समावेश आहे. ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलियोमध्ये ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, पहिल्या इलेक्ट्रिक सुपरकार्स ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आदींचा समावेश आहे. ऑडीने नुकतेच भारतातील सर्वाधिक पसंती मिळालेले मॉडेल ऑडी क्यू३ करिता ऑनलाईन बुकिंग सुरु केली आहे.
[read_also content=”ऑडीकडून भारतात नवीन ऑडी ए८ एल लाँच https://www.navarashtra.com/automobile/audi-launches-new-audi-a8l-in-india-303897.html”]