फोटो सौजन्य: iStock
ऑडीच्या अनेक कार लोकप्रिय
आता कंपनी आणतेय इलेक्ट्रिक हॅचबॅक कार
जाणून घ्या अपेक्षित किंमत
आजच्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्री वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, कमी इंधन खर्च आणि सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या जुन्या आणि लोकप्रिय मॉडेल्सना नव्या अवतारात पुन्हा बाजारात आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर Audi पुन्हा एकदा आपली प्रसिद्ध Audi A2 नव्या रूपात सादर करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, यावेळी ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारात आणली जाणार आहे.
Audi ने सर्वप्रथम 1999 साली A2 हॅचबॅक सादर केली होती. त्या काळात ही कार हलक्या वजनामुळे, उत्तम फ्यूल इकॉनॉमीमुळे आणि वेगळ्या डिझाइनमुळे खूप चर्चेत आली होती. आता कंपनी पुन्हा एकदा A2 या नावाला नवसंजीवनी देत आहे, मात्र यावेळी ती आधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासह सादर केली जाईल. नवीन A2 ही Volkswagen च्या MEB (Modular Electric Drive Matrix) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. याच प्लॅटफॉर्मवर अनेक आधुनिक इलेक्ट्रिक गाड्या तयार केल्या जात आहेत.
मिडल क्लास पब्लिकसाठी Hero च्या ‘या’ Bikes म्हणजे एकदम झकास! किंमत फक्त 56,742 रुपयांपासून सुरु
डिझाइनच्या दृष्टीने पाहता, नवीन A2 ही पारंपरिक हॅचबॅक आणि क्रॉसओव्हर यांचा कॉम्बिनेशनअसलेली कार असू शकते. त्यामुळे तिला आकर्षक लुकसह अधिक ग्राउंड क्लिअरन्स आणि प्रॅक्टिकल वापराची सोय मिळू शकते. ही कार Audi च्या एंट्री-लेव्हल मॉडेल म्हणून सादर केली जाणार असल्याने ती नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यावर कंपनीचा भर असेल.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, जरी ही Audi ची सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार असण्याची शक्यता असली तरी ती प्रीमियम सेगमेंटमध्येच राहील. अंदाजे तिची किंमत सुमारे 30 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृतपणे रेंज, बॅटरी क्षमता, चार्जिंग वेळ आणि इतर फीचर्सबाबत माहिती जाहीर केलेली नाही.
Tata Sierra, Scorpio की Creta? कोणत्या SUV ला ग्राहक देतात भरघोस प्रतिसाद?
भारतीय बाजाराचा विचार केला तर, यापूर्वी Audi Q2 ही कंपनीची सर्वात स्वस्त कार होती, जी आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन A2 भारतात येण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे, कारण भारतात लक्झरी हॅचबॅक कार्सची मागणी तुलनेने कमी आहे. तरीही, जागतिक बाजारात Audi आपली इलेक्ट्रिक लाइनअप मजबूत करत असून, भविष्यात कंपनीकडून अनेक नवीन आणि प्रगत मॉडेल्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






