(फोटो सौजन्य-AI एआय)
हिवतापाच्या तपासणीसाठी आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४० रक्तनमुने, तर डेंग्यूसाठी १ हजार ९१३ रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत हिवतापाचे ५ आणि डेंग्यूचे ७ रुग्ण बाधित आढळले. संबंधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार करण्यात शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याबरोबरच बाधित परिसरातील इतर नागरिकांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवले जात आहे. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नियंत्रणावर भर डेंग्यू आणि हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, टेमिफॉस अॅक्टिव्हिटी आणि गप्पी मासे सोडण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यास कर प्राधान्य देण्यात येत आहे. जून महिना हिवताप प्रतिरोध महिना, तर जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून विविध उपक्रम घेण्यात आले. २५ एप्रिल हिवताप दिन आणि १६ मे डेंग्यू दिनानिमित्तही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना हिवताप प्रतिबंधात्मक कालावधीपूर्वीच आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. रक्तनमुने आणि रक्तजल नमुने तपासणीसाठी आवश्यक साहित्य तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी लागणारी कीटकनाशकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे संशयित रुग्ण आढळल्यास तपासणी आणि उपचाराची प्रक्रिया वेगाने राबविणे शक्य होत आहे.
जिल्ह्यात डेंग्यू व हिवताप प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाकडून सर्व स्तरांवर सातत्याने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बाधित गावांवर विशेष लक्ष डेंग्यू अथवा हिवतापाचा रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे रक्तनमुने आणि रक्तजल नमुने तपासले जात आहेत. संशयित रुग्णांची वेळेत तपासणी झाल्याने आजाराचे निदान लवकर होण्यास मदत होत आहे. बाधित रुग्णाच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करून आजाराचा पुढील प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खासगी रुग्णालयांतील रुग्णांचीही डेंग्यू व हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्व स्तरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. संशयित रुग्णांची तातडीने तपासणी, बाधित भागातील रक्तनमुने संकलन, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, धूर फवारणी आणि डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नागरिकांनीही घर व परिसरात पाणी साचू न देणे, पाणीसाठे नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
डेंग्यू आणि हिवताप हे नोटिफायबल आजार असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त होते. संबंधित रुग्ण ज्या गावात राहत आहे, त्या ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. खासगी रुग्णालयांमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांच्या रक्त व रक्तजल नमुन्यांची शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी करून आजाराचे निदान निश्चित केले जाते.






