Mandhardevi Girls Boys won Gold Medal, Silver Medalin Relay:
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ४×१०० मीटर रिले संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात हंसिका तुपे, ज्ञानेश्वरी जाधव, अनुष्का निकम, श्रेया सावंत व स्वराली जगदाळे यांचा समावेश होता.तसेच मुलांच्या ४×४०० मीटर रिले संघाने दमदार कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या संघात हर्षवर्धन पवार, श्रवण गाढवे, विघ्नेश चिकणे, अभय मांढरे व श्रेयश बोबडे यांचा समावेश होता.
वैयक्तिक प्रकारात अनुष्का निकम हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळविले, तर वैष्णवी डेरे हिने ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंना न्यू इंग्लिश स्कूल, मांढरदेव तसेच किसन वीर महाविद्यालय, वाई येथे शिक्षण घेत असताना नियमित सरावासाठी मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या मिशन लक्षवेध सेंटरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रशिक्षण दिले जाते. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे व रेखा कोचळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्यस्तरावरही यश संपादन करू शकतात, हे या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मुख्य क्रीडा अधिकारी संस्कृती मोरे, काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धर्माजी मांढरे, सचिव दत्तात्रय मांढरे,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक धोंडराम वाडकर,टीम वाईचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व व्यापारी वर्ग यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






