फोटो सौजन्य: Social Media
भारतात बाईक्स वापरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. हीच बाब लक्षात घेता भारतातील दुचाकी उत्पादक कंपन्या देशात अनेक उत्तम बाईक्स ऑफर करत असतात. पूर्वी बाईक विकत घेताना, ग्राहक फक्त मायलेजवर लक्ष द्यायचे. पण आज ही स्थिती बदलली आहे. आजच ग्राहक बाईक घेताना, त्याच्या लूक आणि डिझाइनवर सुद्धा लक्ष देत आहे.
आता बीएमडब्ल्यू मोटाराड इंडिया भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये त्यांच्या बाईक प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. त्यात 2025 BMW S 1000 RR असणार आहे. कंपनी ही बाईक ऑटो एक्स्पो 2025 मध्ये ही बाईक लाँच करणार आहे. गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अपडेटेड S 1000 RR ला 2025 साठी एक नवीन रिफ्रेश लूक देण्यात आला आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ही नवीन बाईक कोणत्या अपडेट्ससह लाँच केली जाऊ शकते, याबद्दल जाणून घेऊया.
25 वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे ‘ही’ कार, आजही विक्रीत भल्याभल्याना टाकते मागे
या बीएमडब्ल्यू मोटरसायकलमध्ये बदल म्हणून, मोठ्या विंगलेटसह पुन्हा डिझाइन केलेले फेअरिंग दिसेल. ब्रेक चांगल्या प्रकारे थंड होण्यासाठी त्यात इंटीग्रेटेड ब्रेक डक्ट दिले आहेत.
यात गोल हेडलॅम्प कव्हरसह नवीन डिझाइन केलेला फ्रंट असेल. M 1000 RR ने प्रेरित झालेले मोठे विंगलेट पूर्वीपेक्षा डाउन फोर्स आणि एरोडायनामिक्समध्ये सुधारणा करतात.
नवीन BMW S 1000 RR जागतिक बाजारपेठेत तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, जे ब्लॅक स्टॉर्म मेटॅलिक, मॅट अॅक्सेंटसह ब्लूस्टोन मेटॅलिक आणि लाइटव्हाइट युनि/एम मोटरस्पोर्ट आहेत.
स्टायलिश Mahindra XEV 9e ला खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment, किती असेल EMI?
या बाईकला रेस प्रोसह प्रो रायडिंग मोडसह आणले आहे, ज्यामध्ये पाच अॅडजेस्टेबल ABS सेटिंग्ज आहेत. यात ९९९ सीसी इनलाइन-४ इंजिन वापरले आहे, जे २०६ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्स आणि सुरळीत शिफ्टिंगसाठी सरळ-कट गीअर्सशी जोडलेले आहे.
या बीएमडब्ल्यू मोटरसायकलमध्ये अॅक्शन कंट्रोल, स्लाईड कंट्रोल, ब्रेक स्लाईड असिस्टसह एबीएस, हिल स्टार्ट कंट्रोल, बाय-डायरेक्शनल क्विक-शिफ्टर, लॉन्च कंट्रोल आणि पिट लेन लिमिटर अशी फीचर्स आहेत. याशिवाय, BMW S 1000 RR मध्ये ट्रॅक सेशन ब्रेक कंट्रोल (DBC), ब्रेक कूलिंग डक्ट फ्रंट फेंडरमध्ये इंटिग्रेटेड आहे.
कंपनीने 2024 मध्ये 8,301 बाईक्स वितरित केल्या होत्या. जुलै ते डिसेंबर या कालावधीत 4,687 बाईक्सची विक्री झाली, जी आतापर्यंतची सर्वाधिक सहामाही विक्री आहे, ज्यामध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने 1,041 वाहने वितरित करून तिच्या पूर्णपणे बिल्ट-अप (CBU) बाईक पोर्टफोलिओसाठी विक्रमी वार्षिक विक्री गाठली.