फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठीने सोशल मीडियावर तुफान आणलं आहे. जेव्हापासून राखी सावंतची एंट्री झाली आहे तेव्हापासून घरामध्ये कल्लाच सुरु झाला आहे. अशामध्ये घरातली तोफ म्हणून ओळखली जाणारी रुचिता जामदार, राखी नावाच्या दारुगोळ्यासमोर फिकी पडलेली दिसून येत आहे. कारण नुकतीच बिग बॉसने एक प्रोमो शेअर केले आहे. या प्रोमोमध्ये रुचिता आणि राखी, यांच्यामध्ये वाद झालेला दिसून येत आहे. प्रेक्षकांना माहितीच असेल की ज्या वादात रुचिता आहे तिथे तोफही रुचिताच असेल पण बिग बॉसची ही धगधगती तोफ राखीच्या समोर शांत उभी दिसून येत आहे.
काय आहे प्रोमो?
अगदी काही वेळेपूर्वीच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. आजच्या भागात रुचिता आणि राखीमध्ये वाद दिसून येणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला राखी रुचिताला म्हणते की “एका शोसाठी तू तुझी लेव्हल पाडलीस रे!” त्यानंतर राखीने रुचिताकडे पाहत “आ..थू! शेम्बडी!” या शब्दात हिणवले. तेव्हा रुचिता राखीला “तुझीही लेव्हल दिसतेय” या शब्दांनी प्रत्युत्तर देते आणि राखीला चॅलेंज करते की “तुझ्यामध्ये दम असेल तर मैदानात ये. तुला एका हातानेच पछाडते बघ! पण तुझ्यात इतका दम नाहीये.” तेव्हा राखी रुचिताला “ए टवळे” या शब्दात हिणवते. त्यांनतर राखी जो रणसंग्राम सुरु करते, त्यात रुचिता इतकी पछाडली जाते की या डावपेचात राखीचा बाजी मारते आणि कधीही शांत न बसणारी तोफ रुचिता शांत उभी राहून पाहत राहते.
राखी काय म्हणते?
राखी रुचिताला चिडवण्यासाठी म्हणते की “हे विशाल… मी तुझ्याशिवाय तर जगूच शकणार नाही रे! मला तू हवा आहेस. मी एकटी नल्ली आहे रे! मी एकटी खेळूच शकत नाही. मला प्रेम पाहिजे रे विशाल. मला काय पाहिजे? मला ट्रॉफी नकोय रे.” राखीच्या अशा ड्रॅामाने रुचिता स्तब्धच झाली.
कालच्या भागात काय घडलं?
कालच्या भागात रुचिताने तिला तिच्या आयुष्यात विशालचे असणे किती महत्वाचे आहे, याबद्दल सांगितले. तिच्या मनात विशालसाठी असणाऱ्या भावना स्पष्टपणे दिसून आल्या होत्या. हे स्वतः रुचितानेही स्वतःच्या शब्दात स्पष्ट केले होते. त्यामुळेच आजच्या मुद्द्यात राखीने रुचिताची विशालबद्दल असणाऱ्या भावनांना पकडून खिल्ली उडवली.






