Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारच्या क्रॅश टेस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टींची चाचणी केली जाते? जाणून घ्या क्रॅश टेस्टची A टू Z माहिती

कारच्या क्रॅश टेस्टमध्ये अपघात घडवून कारची रचना, एअरबॅग्ज आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची सखोल चाचणी केली जाते. या चाचणीच्या रेटिंगवरून कार प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहे हे ० ते ५ स्टार मानांकनाद्वारे ठरवले जाते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 12, 2026 | 11:02 PM
कारच्या क्रॅश टेस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टींची चाचणी केली जाते? जाणून घ्या क्रॅश टेस्टची A टू Z माहिती
Follow Us
Follow Us:

नवीन कार खरेदी करताना आपण तिचा लूक, मायलेज आणि फीचर्स आवर्जून पाहतो. पण सध्याच्या काळात या सर्वांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे तो म्हणजे ‘कार सेफ्टी’.कोणतीही कार रस्त्यावर येण्यापूर्वी ती प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी क्रॅश टेस्ट केली जाते. Global NCAP किंवा भारताची स्वतःची Bharat NCAP या संस्था या चाचण्या घेतात. चला तर मग जाणून घेऊया, कारच्या क्रॅश टेस्टमध्ये नेमके काय आणि कसे तपासले जाते,

१. क्रॅश टेस्ट म्हणजे काय?

क्रॅश टेस्ट म्हणजे कारची सुरक्षा तपासण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेला नियंत्रित अपघात. यामध्ये कार वेगवेगळ्या वेगाने (साधारणपणे ६४ किमी/तास) एखाद्या स्थिर भिंतीला किंवा दुसऱ्या वाहनाला धडकवली जाते. कारच्या आत माणसांऐवजी हुबेहूब माणसांसारखे दिसणारे पुतळे बसवले जातात. या डमीजमध्ये हाय-टेक सेन्सर्स बसवलेले असतात, जे अपघाताच्या वेळी मानवी शरीरावर कुठे आणि किती गंभीर दुखापत होऊ शकते, याची नोंद करतात.

Crash Test मध्ये डमी का वापरतात? कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

२. क्रॅश टेस्टचे मुख्य प्रकार

कारवर वेगवेगळ्या कोनातून होणाऱ्या आघातांचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात:

फ्रंटल इम्पॅक्ट: कार समोरून धडकल्यास काय होईल हे यात पाहिले जाते. ६४ किमी/तास वेगाने कार समोरच्या अडथळ्याला धडकवली जाते.

साइड इम्पॅक्ट: जर एखाद्या वाहनाने कारला बाजूने धडक दिली, तर प्रवाशांना किती दुखापत होईल, हे ५० किमी/तास वेगाने चालणाऱ्या ट्रॉलीद्वारे तपासले जाते.

पोल क्रॅश टेस्ट: कार घसरून एखाद्या खांबाला किंवा झाडाला बाजूने धडकली, तर कारचे छत आणि एअरबॅग्ज प्रवाशांचे रक्षण करू शकतात का, हे यात पाहिले जाते.

३. चाचणी दरम्यान कोणत्या गोष्टी तपासल्या जातात?

क्रॅश टेस्टमध्ये केवळ कारच्या पत्र्याचे नुकसान पाहिले जात नाही, तर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची अगदी ‘A टू Z’ तपासणी केली जाते,

प्रौढांची सुरक्षा: ड्रायव्हर आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या डोक्याला, मानेला, छातीला आणि पायांना किती इजा होते, हे तपासले जाते.

बालकांची सुरक्षा: कारच्या मागील सीटवर बसवलेल्या लहान मुलांच्या डमीजवर (१.५ ते ३ वर्षे वयोगटातील) काय परिणाम होतो, हे पाहिले जाते. यासाठी कारमध्ये ‘Isofix’ चाईल्ड सीट अँकर किती प्रभावी आहे, हे तपासतात.

एअरबॅग्जची कामगिरी: अपघाताच्या अचूक मायक्रोसेकंदात एअरबॅग्ज उघडतात की नाही आणि त्या डमीचे संरक्षण करतात का, हे पाहिले जाते.

कारची रचना आणि केबिन स्थिरता: अपघातानंतर कारचे इंजिन केबिनमध्ये घुसते का? प्रवाशांची जागा सुरक्षित राहते की चक्काचूर होते? हे पाहिले जाते. जर केबिन स्थिर राहिली तर वाचण्याची शक्यता जास्त असते.

दरवाजे लॉक होणे: अपघातानंतर कारचे दरवाजे सहज उघडता येतात की ते जाम होतात? कारण सुरक्षिततेसाठी अपघातानंतर बाहेर पडण्यासाठी दरवाजे उघडणे आवश्यक असते.

फक्त मायलेज आणि इंजिन नाही! नवीन कार खरेदी करताना तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स

४. स्टार रेटिंग कसे मिळते?

सर्व चाचण्यांचे सेन्सर रीडिंग आणि व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर कारला ० ते ५ स्टार दरम्यान रेटिंग दिले जाते.

५-स्टार: कार अत्यंत सुरक्षित आहे आणि अपघातात जीव वाचण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

०-स्टार: कारची सुरक्षा अत्यंत खराब आहे आणि ती अपघाताच्या वेळी प्रवाशांचे रक्षण करण्यास असमर्थ आहे.

भारतात आता Bharat NCAP (B-NCAP) सुरू झाले आहे, जे भारतीय रस्त्यांच्या आणि वाहनांच्या परिस्थितीनुसार कारची सुरक्षा तपासते.

नवीन कार घेताना नेहमी तिचे क्रॅश टेस्ट रेटिंग नक्की तपासा, कारण कारचे फीचर्स तुम्हाला आराम देऊ शकतात, पण चांगली क्रॅश टेस्ट रेटिंग तुमचा जीव वाचवू शकते!

Web Title: Car crash test process details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:02 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • cars

संबंधित बातम्या

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
1

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
2

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
3

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
4

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.