Nissan Tekton : ‘वन कार, वन वर्ल्ड’ संकल्पनेत आणली नवीन गाडी! भारतात झाली लाँच, फीचर्समध्ये A1
ग्राहकांसाठी इंजिन आणि परफॉर्मन्स हे सर्वोच्च प्राधान्य असले तरी, आता त्यांना अशी वाहनेही हवी आहेत जी प्रत्येक प्रवासाला आरामदायक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवतील. यामुळेच कंपन्या केबिनमधील अनुभव आणि स्मार्ट फीचर्सवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहेत.
नवीन गाड्यांमधील डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या इन्फोटेनमेंट स्क्रीनच्या संयोजनामुळे ग्राहकांना एक प्रीमियम अनुभव मिळतो, ज्यामुळे महत्त्वाची माहिती पाहणे, तसेच मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीचा लाभ घेणे सोपे होते. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या आधुनिक गाड्यांमध्ये हे फिचर्स उपलब्ध आहे.
या यादीतील आणखी एक फिचर्स म्हणजे पॅनोरामिक आणि व्हॉइस-असिस्टेड सनरूफ. पूर्वी हे फिचर्स फक्त काही हाय-एंड गाड्यांमध्ये उपलब्ध होते, पण आता ते मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्येही पोहोचत आहे. पॅनोरॅमिक सनरूफमुळे केबिन अधिक प्रशस्त आणि प्रीमियम वाटते. बऱ्याच गाड्यांमध्ये ते व्हॉइस कमांडने देखील चालवता येते. हे फिचर्स महिंद्रा XUV 3XO, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे.
भारतात बऱ्यापैकी उष्णता असते, त्यामुळे व्हेंटिलेटेड सीट्स हे एक उपयुक्त फिचर्स बनले आहे. या सीट्स हवेच्या साहाय्याने शरीराला थंड करतात, ज्यामुळे लांबचा प्रवासही आरामदायी होतो. हे फिचर्स ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन (हाय व्हेरियंट) मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) आता केवळ आलिशान गाड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग यांसारखी वैशिष्ट्ये वाहन चालवणे अधिक सुरक्षित करतात. हे फिचर्स ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ मध्ये उपलब्ध आहे.
गर्दीच्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये पार्किंग करणे नेहमीच सोपे नसते. ३६०-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटरमुळे चालकाला गाडीच्या सभोवतालचे स्पष्ट दृश्य मिळते, ज्यामुळे पार्किंग करणे आणि अरुंद जागेत गाडी वळवणे सोपे होते. आजकालच्या आधुनिक गाड्यांमध्ये हे उपलब्ध आहे, जसे की ह्युंदाई क्रेटा (360° कॅमेरा + ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर), किया सेल्टोस (360° कॅमेरा + ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर), आणि टाटा नेक्सॉन (360° कॅमेरा).
इंजिन, मायलेज आणि परफॉर्मन्स हे महत्त्वाचे असले तरी, ग्राहक आता सुरक्षितता, सोय आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीलाही तितकेच महत्त्व देत आहेत. म्हणूनच नवीन कार खरेदी करताना केबिनमधील फिचर्स पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.






