फोटो साैजन्य: Social Media
आपली स्वतःची कार किंवा बाईक घेऊन मित्र मंडळी किंवा कुटुंबासोबत फिरायला जावं असे प्रत्येकालाच वाटते. सध्या हिवाळ्याचा ऋतू सुद्धा चालू झालं आहे. या मोसमात अनेक जण माळशेज घाट, माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे प्लॅन बनवत असतात. पण जर आपण एखाद्या लॉंग ट्रिपचा आनंद घेत असू आणि अचानक पोलीस मामा आपल्याला अडवतात, तर नकीच आपला मूड खराब होऊ शकते.
एवढेच काय दैनंदिन कामानिमित्त कार किंवा बाईक घेऊन बाहेर पडल्यावर ट्रॅफिक पोलिसांनी पकडले आणि दंड बसवला, तरी पूर्ण दिवस वाईट बनून जातो. म्हणूनच आपण आज एका अशा अॅपबद्दल जाणून घेणार आहोत जो नक्कीच तुमच्या मोबाइलमध्ये असेल पण त्याचा वापर ट्रॅफिक दंड न बसावा म्हणून कसा केला जाईल याबद्दल तुम्हाला ठाऊक नसेल.
Maruti Dzire 2024 विकत घेतल्यास किती असेल EMI जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुम्ही तुमच्या कारमधून दररोज कामावर जात असाल आणि वाटेत तुमच्या कारवर काही कारणास्तव दंड बसत असेल तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या कारला चलनापासून वाचवण्याचे उपाय सांगणार आहोत. खरं तर, हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. गुगल मॅपमध्ये अशी काही फीचर्स आहेत जी तुम्हाला चलनापासून वाचवू शकतात.
स्पीड लिमिट वॉर्निंग: हे फीचर्स तुमच्या कारचा स्पीड ट्रॅक करते आणि तुम्ही स्पीड लिमिटपेक्षा जास्त वेगाने कार चालवत असाल तर तुम्हाला वॉर्निंग देते. हे फिचर तुम्हाला ट्रॅफिक चलन टाळण्यास मदत करू शकते.
स्पीड कॅमेरा अलर्ट: हे फिचर तुम्हाला तुमच्या मार्गावर येणाऱ्या स्पीड कॅमेऱ्यांबद्दल माहिती देते. हे फिचर तुम्हाला स्पीड कॅमेरे टाळण्यात मदत करू शकते.
ट्रॅफिक अलर्ट: हे फिचर तुम्हाला रस्त्यावरील गर्दी आणि इतर अडथळ्यांबद्दल माहिती देते. हे फिचर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकू नये यासाठी मदत करू शकते.
Skoda-Volkswagen ने ‘या’ मॉडेल्सच्या 52 कार्स बोलावल्या परत, जाणून घ्या कारण?
ही फीचर्स अॅक्टिव्ह करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Google मॅप्स ॲपमधील सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला “नेव्हिगेशन” टॅबवर जावे लागेल आणि यानंतर “ड्रायव्हिंग ऑप्शन” निवडावे लागेल. ही फीचर्स अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला टॉगल स्विच चालू करावा लागेल.
या फीचर्सचा वापर करून, तुम्ही ट्रॅफिक चलान टाळू शकता आणि सुरक्षितपणे कार चालवू शकता.
1.नेहमी स्पीड लिमिट पाळा.
2. ट्राफिक रूल्सचे पालन करा.
3. तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, इंश्युरन्स आणि इतर आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा.
4.तुमचे वाहन व्यवस्थित ठेवा.
5. रस्त्याकडे लक्ष द्या आणि इतर ड्रायव्हर्सपासून योग्य अंतर राखा.