फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक वाहनं लाँच होत आहे. त्यातही विशेषकरून भन्नाट फीचर्स असणाऱ्या बाइक्स आणि स्कुटर्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. प्रत्येक जण आपल्या आवश्यकतेनुसार बाईक किंवा स्कुटर निवडत असतो. यातही जर रहदारी असणाऱ्या भागात दुचाकी चालवायची असेल तर जणांची पहिली पसंत ही स्कुटरच असते. स्कुटर ही बाईक पेक्षा चालवण्यात सोपी आणि सोयीस्कर असते. यामुळेच अनेक कंपनीज मार्केटमध्ये नवनवीन स्कुटर लाँच करत असते.
आता लवकरच Hero MotoCorp 9 सप्टेंबरला नवीन Hero Destini 125 लाँच करणार आहे. स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर फ्रंट डिस्क ब्रेक, डिजिटल डिस्प्ले, स्क्वेअर एलईडी हेडलाईट यासह इतर अनेक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहे. ही स्कुटर लाँच करण्यापूर्वी Hero MotoCorp ने या नवीन स्कुटर संदर्भात दोन टीझर रिलीज केले आहेत. चला जाणून घेऊया, या स्कुटरमध्ये काय खास असणार आहे.
Hero MotoCorp ने सोशल मीडियावर रिलीज केलेल्या दोन टीझरमध्ये Hero Destini 125 ची अनेक बदल समोर आले आहेत. त्यातील सर्वात मोठा बदल त्याच्या डिझाइनमध्ये होणार आहे. डेटाइम रनिंग लाइट, रिपोजीशन केलेले फ्रंट इंडिकेटर, लांब सीट्स आणि कांस्य ॲक्सेंटसह हे नवीन डिझाइन देण्यात आले आहे.
स्कूटरच्या मागील बाजूस डिजीटल डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह, इंडिकेटरसाठी वेगळा सेक्शन असलेला स्लीकर LED टेललाइट आणि वरच्या XTEC व्हेरियंटवर पॅसेंजर बॅकरेस्ट दिले आहे.
या नवीन Hero Destiny 125 स्कूटरला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. स्कूटरमध्ये अंदाजे 12-इंच आकाराचे अलॉय व्हील आणि फ्रंट डिस्क ब्रेक आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर्स हाय-एंड व्हेरियंटसह पाहिले जाऊ शकतात.
9 सप्टेंबर रोजी लाँच होणाऱ्या नवीन Hero Destiny 125 स्कूटरमध्ये एअर-कूल्ड, 124.6cc, सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे 9.1hp ची पॉवर आणि 10.4Nm टॉर्क जनरेट करेल. कंपनी नवीन या नवीन स्कूटरमधील पॉवर प्लांटमध्ये काही बदल करणार आहे की नाही हे पाहणे रंजक असेल.