Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घंटागाडी’ची सुरुवात महाराष्ट्रातील ‘या’ शहरातूनच झाली! ही आहे घंटागाडीची इंटरेस्टिंग गोष्ट!

तुम्महाला माहितीय का महाराष्ट्रातील एका शहराने सुरू केलेल्या साध्या लोखंडी घंटेच्या प्रयोगातून 'घंटागाडी'चा जन्म झाला, ज्याने पुढे संपूर्ण देशातील कचरा व्यवस्थापनाची पद्धत कायमची बदलली!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 24, 2026 | 07:39 PM
‘घंटागाडी’ची सुरुवात महाराष्ट्रातील ‘या’ शहरातूनच झाली! ही आहे घंटागाडीची इंटरेस्टिंग गोष्ट!
Follow Us
Follow Us:

भारतातील शहरांमध्ये आणि गावांमध्ये सकाळी उठल्याबरोबर एका विशिष्ट घंटेचा आवाज आपल्या कानावर पडतो, तो म्हणजे कचरा गोळा करणाऱ्या ‘घंटागाडीचा’. आज ही घंटागाडी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. वाहन उद्योगाचा अजून एक उत्तम नमुना म्हणून या घंटागाडीकडे पहिले जाऊ शकते. ऑटोमोबाईल सार्वजनिक स्वच्छतेच्या क्षेत्रातील हा एक अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण बदल मानला जातो.

घंटागाडीचा शोध आणि सुरुवात

घंटागाडीच्या या संकल्पनेचा उगम आणि पहिली यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्रातील नाशिक महानगरपालिकेने केली. नाशिक हे घंटागाडीचे ‘जनक’ मानले जाते. १९९० च्या दशकात नाशिक शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत असत, ज्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरत असे. या समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन प्रशासनाने आणि स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनी मिळून ‘घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची’ एक अनोखी योजना आखली. सुरुवातीला लहान हातगाड्या आणि नंतर वाहनांच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू झाला. नाशिकचा हा ‘कचरामुक्त शहर पॅटर्न’ एवढा यशस्वी ठरला की, पुढे संपूर्ण देशाने ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ हा पॅटर्न स्वीकारला.

Nashik Crime: कन्नमवार पुलाखालील आढळला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; प्रेमसंबंधातून हत्येचा संशय

‘घंटागाडी‘ नावामागची रंजक गोष्ट

या गाडीला ‘घंटागाडी’ हे नाव मिळण्यामागे एक अतिशय व्यावहारिक आणि इंटरेस्टिंग कारण आहे. सुरुवातीच्या काळात आजच्यासारखे आधुनिक लाऊडस्पीकर किंवा गाणी लावणारी डिजिटल सिस्टीम नव्हती. तसेच, कचरा वेचणारे कर्मचारी गल्लोगल्ली आल्यानंतर प्रत्येक घराचे दार वाजवून कचरा गोळा करणे शक्य नव्हते. लोक घरात व्यस्त असायचे आणि गाडी येऊन निघून गेल्यावर पुन्हा रस्त्यावर कचरा फेकला जायचा.

यावर उपाय म्हणून, कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर किंवा कर्मचाऱ्यांच्या हातातील गाडीला शाळेच्या घंटेसारखी एक मोठी लोखंडी किंवा तांब्याची ‘घंटा’ बांधण्यात आली. गाडी गल्लीत आली की कर्मचारी ती घंटा जोरात वाजवायचे. घंटेचा तो आवाज ऐकून नागरिकांना समजायचे की कचरा घेणारी गाडी आली आहे. मग लोक घरातील कचरा घेऊन बाहेर येत असत. घंटेच्या या आवाजामुळे लोक गाडीची वाट पाहत उभे राहू लागले आणि रस्त्यावरील कचराकुंड्या हळूहळू गायब झाल्या. घंटेच्या या अफलातून वापरामुळे जनतेनेच या गाडीचे नाव अगदी आपुलकीनेचं ‘घंटागाडी’ असे ठेवले.

Nashik Farmers : शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया

आज तंत्रज्ञान बदललेले असून घंटेची जागा देशभक्तीपर, स्वच्छतेच्या गाण्यांनी घेतली असली, तरीही लोकांच्या मनात या गाडीचे ‘घंटागाडी’ हेच नाव कायम टिकून आहे. नाशिकमध्ये सुरु झालेल्या या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घंटागाडीचा डंका आज संपूर्ण भारतात ‘स्वच्छ भारत अभियान’ मधूनही वाजत आहे.

Web Title: History of ghantagadi automobile lifestyle news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • automobile
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
1

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
2

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट
3

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट

टोयोटाच्या या 2 कारचे येणार फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या काय बदलणार?
4

टोयोटाच्या या 2 कारचे येणार फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या काय बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.