फोटो सौजन्य: Social Media
भारतात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार उपलब्ध आहे. पण त्यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कारची क्रेझ ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते. आज अनेक सेलिब्रेटी आणि नेतेमंडळी एसयूव्ही कारला आपल्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट करत असतात. एसयूव्ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत सुद्धा चांगली असते.
देशात अनेक एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत. पण एसयूव्ही म्हंटलं की अनेकांना महिंद्रा कंपनी आठवते. महिंद्राने देशात दमदार एसयूव्ही सादर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही सुद्धा लाँच केल्या आहेत.
भारतात बनणारी ‘ही’ कार आता जपानमध्ये घालणार धुमाकूळ, तब्बल 100 देशात केली जाते निर्यात
महिंद्रा थार ही भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये या कारचे 5 -डोअर मॉडेल बाजारात लाँच करण्यात आली होती. महिंद्रा थारचे नवीन व्हर्जन देखील लोकांना आवडत आहे. ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
महिंद्रा थार रॉक्सची किंमत १२.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २३.०९ लाख रुपयांपर्यंत जाते. ही महिंद्रा कार खरेदी करण्यासाठी एकाच वेळी पूर्ण पैसे देण्याची गरज नाही. ही एसयूव्ही कार लोनवर देखील खरेदी करता येऊ शकते. चला जाणून घेऊया ही एसयूव्ही EMI वर कशी खरेदी करता येईल.
फक्त 25000 रुपयात बुक करता येईल Hyundai Creta Electric, लवकरच सुरु होणार डिलिव्हरी
महिंद्रा थार रॉक्सचे सर्वात स्वस्त मॉडेल MX1 RWD (पेट्रोल) आहे. थार रॉक्सच्या या व्हेरियंटची किंमत राजधानी दिल्लीत 12.99 लाख रुपये आहे. ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला 11.69 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त कर्ज मिळू शकेल.