फोटो सौजन्य: Freepik
आपल्या इथे जेवढा कार घेताना विचार करावा लागतो तेवढाच विचार इन्शुरन्स घेताना सुद्धा करावा लागतो. याचे कारण म्हणजे चुकीचे कार इन्शुरन्स क्लेम करता करता लोकांच्या नाकी नऊ येत असतात. कार इन्शुरन्स निवडताना काही बाबींचा विचार करणे महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया, एक चांगला कार इन्शुरंस कसा निवडावा व त्याचे प्रकार किती?
कार इन्शुरन्स अनेक कव्हरेज पर्यायांसह येतो, ज्यांचे वेगवेगळे हेतू असतात. यात लाएबिलिटी किंवा थर्ड-पार्टी कव्हरेज तुमच्याकडून इतरांना झालेल्या नुकसानीसाठी पैसे देतात. यासोबतच कायदेशीर पूर्तताही आवश्यक आहे. अपघाताच्या वेळी तुमच्या कारचे संरक्षणासाठी कोलिजन कव्हरेज असते तर चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या घटनांपासून संरक्षणासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह कव्हरेज असते.
थर्ड पार्टी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर हे दोन प्रकारचे इन्शुरन्स कव्हर भारतात असतात. तुमची कार कायदेशीररित्या चालवण्यासाठी तुमच्याकडे थर्ड-पार्टी इन्शुरन्स कव्हर असणे आवश्यक आहे. दुसरा इन्शुरन्स म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह कव्हर अतिरिक्त फायदे आणि संरक्षणासह येतो.
कार इन्शुरन्स खरेदी करताना हा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करत आहे की नाही यावर लक्ष ठेवा. तुमच्या वाहनाचे वय आणि किंमत, तुमचे बजेट आणि ड्रायव्हिंगच्या सवयी यांचाही विचार करा. तुमच्याकडे उच्च किमतीची कार असल्यास, कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्सची निवड करा. जर तुमच्या कडे जुनी कार असेल तर थर्ड पार्टी इन्शुरन्स एक चांगला पर्याय असू शकतो.
कार इन्शुरन्सची घेण्यापूर्वी, सर्व कंपन्यांच्या किंमती आणि कव्हरेज पर्यायांची तुलना करा. अशावेळी तुमच्या मनात सर्वात स्वस्त पॉलिसी निवडण्याचा विचार येऊ शकतो, परंतु विमा कंपनीच्या एकूण व्हॅल्यूचा विचार करा. एक प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनी थोडी अधिक महाग पॉलिसी ऑफर करेल परंतु चांगली सेवा देऊ शकेल.
तुम्ही ज्या कंपनीकडून इन्शुरन्स घेण्याचा विचार करत आहात त्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) तपासा. यावरून कंपनीने किती जणांना क्लेम मिळवून दिला आहे ते समजेल.