आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ
मोर्टिसिया अॅडम्स सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. तिने खामेनेईंच्या मृत्यूवर आनंद साजर केला आहे तिने सोशल मीडियावर लोकांसह आनंदा साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मोर्टिसिया गाणी गात आनंद व्यक्त करत आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही तुमच्या कबरीवर नाचू आणि #KingRezaPahlvi हा हॅशटॅग वापरला आहे. यापूर्वी मोर्टिसियाने कॅनडात झालेल्या इराणविरोधी निदर्शनात भाग घेतला होता. यावेळी मोर्टिसियाने खामेनेईंचा फोटो सिगारेटने जाळला होता.
گفتم سر قبرتون میرقصیم نگفتم؟#KingRezaPahlavi pic.twitter.com/XkI3m7oYN3 — Morticia Addams 🇮🇷 (@melianouss) February 28, 2026
गेल्या अनेक दशकांपासून इराणमध्ये महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पेहराव्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत महिलांवर बंदी होती. आता मात्र खामेनेईंच्या मृत्यूची माहिती मिळताच राजधानी तेहरानसह, शिराज, इस्फाहान सारख्या मोठ्या शहरांमध्ये महिलांनी जल्लोष साजरा केला आहे. अनेक महिलांना आपले हिजाब काढून हवेत भिरकवले आहेत. महिला रस्त्यांवर येऊन डान्स करत आहेत. एकमेकांना मिठी मारुन आनंद साजरा करत आहेत. यामध्ये काही माजी राजा रझा पहलवी यांच्या समर्थकांचाही समावेश आहे.
Iranian women are dancing in the streets—without hair coverings—after hearing that Israel killed the tyrant Khamenei. So many Western leaders should feel ashamed at their cowardly response this morning. We will all remember. pic.twitter.com/Rh4cJQZGAO — Eylon Levy (@EylonALevy) February 28, 2026
जरी खामेनेईंच्या मृत्यूवर अनेकजण जल्लो साजरा करत असले तर इराणमधील मोठा वर्ग त्यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाला आहे. खामेनेईंच्या अनेक कट्टर समर्थकांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी देशाचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. मशिदींमध्ये जाऊन प्रार्थना केल्या आहेत. त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे. इराणमध्ये सध्या ४० दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्या आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






