Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क
हे डिव्हाईस केवळ स्क्रीन आणि व्हॉईस कमांडपर्यंत मर्यादित नाही. तर डिव्हाईस स्वत: हलू- डूलू शकते, प्रतिक्रिया देऊ शकते आणि यूजरशी भावनिकरित्या संवाद साधू शकते. हा फोन पाहिल्यानंतर असं वाटत आहे की, फोनला हात – पाय आणि डोके मिळाले आहे. या फोनमध्ये आणखी काय खास आहे, त्याची किंमत किती असू शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Get ready to believe!
HONOR Robot and Robot Phone are showing off the incredible power of advanced intelligence, dancing straight into the future. We’re not just building tech, we believe in the future of AI. See it to believe it! 🤖 pic.twitter.com/0SoP6VjXDy — HONOR (@Honorglobal) March 1, 2026
खास गोष्ट म्हणजे हॉनरने सादर केलेल्या या रोबोट फोनमध्ये असा Embodied AI देण्यात आला आहे, जो इंटरॅक्शन पूर्वीपेक्षा अधिक जास्त नैसर्गिक बनवतो. फोनमध्ये ऑल अँगल एआय व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याचा अर्थ कॅमेरा यूजरला ऑटोमॅटिकली फॉलो करतो आणि फ्रेमिंग स्वत: एडजस्ट करतो. एवढंच नाही तर, फोनचे कॅमेरा मॉड्यूल डोके हलवून हो किंवा नाही अशा प्रतिक्रिया देऊ शकतो. फोन म्यूजिक बीटवर हालचाल देखील करतो. यामुळे हा फोन एक मिनी-रोबोट सारखा दिसत आहे. फोनचे हार्डवेअर सेन्सर ध्वनी ओळख, हालचाल ट्रॅकिंग आणि दृश्य जागरूकता सक्षम करतात, ज्यामुळे फोन एक सेंसरी आणि मानवासारखे इंटरॅक्शन देतो.
हे तंत्रज्ञान एका सामान्य स्मार्टफोनमध्ये वापरण्यासाठी कंपनीला अनेक अभियांत्रिकी टप्पे गाठावे लागले आहेत. यासाठी कंपनीने एक कस्टम मायक्रो मोटर देखील विकसित केली जी उद्योग मानकांपेक्षा ७०% लहान आहे. या छोट्या मोटारमुळे HONOR ने इंडस्ट्रीचा सर्वात कॉम्पॅक्ट 4DoF गिंबल सिस्टम फोन सादर केला आहे, जो रोबोटिक मोशन कंट्रोलचा पाया असल्याचे म्हटले जाते.
हॉनर रोबोट फोन मोबाईल व्हिडीओग्राफीच्या प्रो-लेवल आउटपुटसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला 3-Axis Gimbal कॅमेरा दिला आहे, जो एक 200MP सेंसर आहे. डिव्हाईसमध्ये सुपर स्टेडी व्हिडीओ पाहायला मिळत आहे. जो वेगवान हालचालींमध्ये देखील व्यावसायिक दर्जाचे स्थिरीकरण प्रदान करतो. फोनमध्ये एआय ऑब्जेक्ट ट्रॅकिंग फीचर देखील आहे, जे चालणाऱ्या वस्तू रियल टाईममध्ये ट्रॅक करते. फोनमध्ये 90° आणि 180° पर्यंत इंटेलिजेंट कॅमेरा रोटेशन आहे, ज्यामुळे एका हाताने कॅप्चर करता येते आणि सिनेमॅटिक ट्रान्झिशन तयार करता येते. या डिव्हाईसची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही.






