दिल्लीतील हिंसाचार घटनेत 5 पोलिस जखमी (प्रातिनिधिक फोटो - सोशल मीडिया)
जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेटजवळ परिस्थिती तणावपूर्ण
रात्रीच्या वेळेस झालेली मोठ्या प्रमाणात दगडफेक
परीसराला आले छावणीचे स्वरूप
दिल्ली: दिल्ली हायकोर्टाने 12 नोव्हेंबर 2025 रोजी दीलल्या आदेशानुसार, जुनी दिल्लीमधील तुर्कमान गेटजवळ अतिक्रमणविरोधी कारवाई केली गेली. हायकोर्टाने रामलीला मैदानाजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने दिल्ली महानगरपालिकेने तुर्कमान गेट जवळील फैज ए इलाही मशिदीजवळ कारवाई करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले.
दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी आणि अन्य यंत्रणा तेथील अतिक्रम हवटण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या भागातील अतिक्रमणावर बुलडोजर कारवाई केली गेली. यानंतर या परीसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे.
पोलिसांनी अज्ञात लोकांवर एफआयआर दाखल केले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. कल झालेल्या दगडफेकीत अनेक पोलिस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. फैज ए इलाही मशिदीजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Delhi | Security heightened in the area near the Faiz-e-Elahi Masjid, Turkman Gate, where a demolition drive was carried out by the MCD last night. Delhi Police has registered an FIR against unknown persons in connection with the stone-pelting incident. The… pic.twitter.com/CMsUBUDfVl — ANI (@ANI) January 7, 2026
अतिक्रमाणवर कारवाई करत असताना येथे झालेल्या हिंसाचारामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागाला 9 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आले आहे. कारवाई करताना पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. अज्ञात लोकांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले आहे. दगडफेक झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
या घटनेत 6 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीच्या सुमारास दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार या भागात कारवाई करण्यात आली आहे. 30 पेक्षा जास्त बुलडोजरमार्फत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे. 200 ट्रकपेक्षा जास्त ट्रकमध्ये कारवाई केलेल्या गोष्टींचे अवशेष भरण्यात आले आहेत. अद्याप 20 टक्के कारवाई बाकी असल्याचे समोर येत आहे. ती कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






