Jeep ची गोल्डन ऑफर! जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांना मोफत मिळणार Wrangler SUV... ही आहे अट
Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन विसरा
हे कँपेन अशा अमेरिकेतील अशा लोकांसाठी आहे, ज्यांचे कायदेशीर नाव जॉर्ज वॉशिंगटन असं आहे. इच्छुक उमेदवारांना एका खास प्लॅटफॉर्मद्वारे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे आणि कडक व्हेरिफिकेशन व नियमांचे पालन करावे लागणार आहे. आधीपासूनच उमेदवारांकडे एक वैध वाहनचालक परवाना असणं आवश्यक आहे, ज्यावर अचूक नाव लिहीले असेल. तसेच, नावाच्या स्पेलिंगमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे बदल मंजूर केले जाणार नाहीत. तसेच या ऑफरमधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अट म्हणजेच ही गाडी मोफत तेव्हाच दिली जाणार आहे, जेव्हा अमेरिकेचा पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ 2026 चा फिफा विश्वचषक जिंकेल. ही अट पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना रँग्लर एसयूव्ही मोफत मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Jeep)
जीपने संभाव्य विजेत्यांची संख्या जास्तीत जास्त 100 पर्यंत मर्यादित केली आहे. याचा अर्थ असा आहे की, जर अमेरिकेच्या पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने 2026 चा फिफा विश्वचषक जिंकला, तर केवळ आधीपासून व्हेरिफाईड आणि रजिस्ट्रेशन केलेल्या लोकांचा ही गाडी मिळणार आहे. पात्र सहभागींमध्ये स्टेलँटिसचे कर्मचारी, एफसीएचे कर्मचारी, त्यांच्या संलग्न एजन्सींचे कर्मचारी आणि या सर्व कर्मचाऱ्यांचे जवळचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.
एका अंदाजानुसार, अमेरिकेत जॉर्ज वॉशिंगटन नावाचे केवळ 300 ते 400 लोकं आहे. यामुळे या कँपेनमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या आधीपासूनच कमी आहे. सर्व अटी आणि नियमांचे पालन केले कर विजेत्यांना 2026 जीप रँग्लर 2-डोअर स्पोर्ट मिळेल. या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटची कंपनीची सुरुवातीची किंमत 39,685 यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 37.44 लाख रुपये आहे.






