फोटो सौजन्य: Social Media
भारतीय रस्त्यांवर जरी बजेट फ्रेंडली बाईक्स दिसत असल्या तरी कित्येक जणांना भुरळ पडते ती लक्झरी आणि हाय परफॉर्मन्स बाईक्सची. या बाईक्स दिसायला तर स्टायलिश असतातच पण त्याचसोबत त्यांच्या किंमती ऐकून सर्वसामान्यांनाच नव्हे तर श्रीमंतांना सुद्धा घाम फुटत असतो.
भारतीय मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पदक कंपनीज आहेत, ज्यांच्या महागडया बाईक्स भारतीय तरुणांना भुरळ पाडत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे कावासाकी. कावासाकी ही दुचाकी उत्पादक कंपनी आपल्या हाय परफॉर्मन्स आणि महाग किंमत असणाऱ्या बाईक्समुळे ओळखलंय जातात.
नुकतेच कंपनीने दोन नव्या बाईक्स भारतीय मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत. या लाँच झालेल्या बाईक्सची किंमत इतकी जास्त आहे की त्यांच्या किंमतीती एक-दोन उत्तम कारही खरेदी करता येतील. Kawasaki Z H2 आणि Z H2 SE या दोन बाईक्स भारतात आणल्या गेल्या आहेत.
ड्रायव्हिंग करताना नाही बसणार Traffic Police चा दंड, फक्त वापरा Google Maps चे ‘हे’ हॅक्स
या नवीन बाईकमध्ये Z H2 ची एक्स-शोरूम किंमत 24.18 लाख रुपये आणि Z H2 SE ची एक्स-शोरूम किंमत 28.59 लाख रुपये आहे. या दोन्ही बाईक्स बऱ्यापैकी सारख्याच आहेत, परंतु ऑटोमेकर्सनी SE व्हर्जन बनवण्यासाठी अधिक प्रीमियम हार्डवेअर वापरले आहेत.
Kawasaki Z H2 SE मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे आणि मिरर कोटेड ब्लॅक कलरसह बाजारात आली आहे. या बाईकचे स्टॅंडर्ड मॉडेल एमराल्ड ब्लेझ्ड ग्रीन आणि मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे, मेटॅलिक डायब्लो ब्लॅक मशीन या कलर ऑप्शन्ससह येणार आहे. कावासाकी बाईक्सचा लूक आणि स्टाइल भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर बाईक्सच्या तुलनेत खूपच वेगळी आहे.
Maruti Dzire 2024 विकत घेतल्यास किती असेल EMI जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
कावासाकी बाईक्स 998 सीसी, इनलाइन 4-सिलेंडर, सुपरचार्जरसह लिक्विड-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहेत. हे इंजिन 11,000 rpm वर 197.2 bhp ची पॉवर निर्माण करते आणि 8,500 rpm वर 137 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये बसवलेल्या मोटरला 6-स्पीड गिअर बॉक्स जोडलेला आहे. यासोबतच ही बाईक स्लिप आणि असिस्ट क्लचसह येते. कावासाकीने बाइकमध्ये द्वि-दिशात्मक द्रुत शिफ्टर प्रदान केले आहे, जे 2,500 rpm पेक्षा जास्त काम करते.
कावासाकी बाईक्समधील ब्रेकिंग सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही मोटरसायकलमध्ये ट्विन 320 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि सिंगल 260 मिमी रोटर आहे. या बाईक ट्रेलीस फ्रेमने बनवल्या जातात ज्या उच्च-टेन्साइल स्टीलने बनविल्या जातात. या बाइकच्या एसई व्हर्जनमध्ये स्कायहूक तंत्रज्ञानासह कावासाकी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सस्पेंशन आहे. यामुळे ही बाईक अत्याधुनिक आहे यात वादच नाही.