फोटो सौजन्य: iStock
सणासुदीचा काळ आता खऱ्या अर्थाने चालू होणार आहे. या काळात अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करताना दिसतात. तसेच कित्येक जण या काळात नवीन कार्स विकत घेताना दिसतात याचे कारण म्हणजे अनेक ऑटो कंपनीजकडून आपल्या कार्सवर विशेष सूट देण्यात येते.
कित्येक जण असेही असतात जे नवीन कार घेण्यापेक्षा सेकंड हँड कार घेणं पसंत करतात. सेकंड हँड कार घेण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे पैश्याची बचत. जर तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या काळात सेकंड हँड कार घेणार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
जेव्हा तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करणार असाल, तेव्हा अंतिम करार करण्यापूर्वी तिची कंडिशन नीट तपासा. जर तुम्हाला तांत्रिक बाबींचे योग्य ज्ञान नसेल तर तुम्ही मेकॅनिकचीही मदत घेऊ शकता.
जुनी कार खरेदी करताना, त्याच्या टायरची स्थिती निश्चितपणे चेक करा. जर टायर खूप खराब असतील तर ते त्वरित बदलून घ्या. अनेक लोक जुनी कार खरेदी केल्यानंतर लगेच टायर बदलतात.
सेकंड हँड कार विकत घेताना त्यात डेंट्स किंवा डॅमेज नाही आहे ना हे नक्की तपासा. कारचे दरवाजे उघडा आणि कारच्या A, B आणि C खांबांमध्ये डेंट्स आहेत का ते तपासा. समोरचे नुकसान तपासण्यासाठी, आपण इंजिन एरिया तपासू शकता.
सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी तिची मेंटेनन्स हिस्ट्री नक्कीच तपासा. यामुळे तुम्हाला कळेल की कारची सर्व्हिस योग्य प्रकारे केली जात आहे की नाही. यामुळे कार किती मेंटेन आहे हे देखील तुम्हाला कळेल.
सेकंड हँड कार घेण्यापूर्वी तिचे रजिस्ट्रेशन नक्कीच तपासा. हे तुम्हाला कारची निर्मिती तारीख काय आहे आणि ती कधी खरेदी केली आहे याबद्दल माहिती देईल. यामुळे कार किती जुनी आहे हे देखील कळेल.
जुनी कार खरेदी केल्यानंतर लगेचच तिचा विमा तुमच्या नावावर ट्रान्स्फर करावा. हे काम वेळेवर न केल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही त्याची टेस्ट ड्राइव्ह घेणे आवश्यक आहे. या वेळी, तुम्ही हायवे, अरुंद रस्त्यावर किंवा रहदारी असलेल्या रस्त्यावर गाडी चालवून त्याची टेस्टिंग करू शकता.